उद्या जिवती येथे तहसील कार्यालयावर सुदाम राठोड यांच्या नेतृत्वात विदर्भ राज्य आंदोलन समितीचा जण आक्रोश मोर्चा ।
विदर्भ माझा न्युज 24 - जिवती
1955 पासून जिवती तालुक्यामध्ये शेतकरी जंगलतोड करून आपला उदरनिर्वाह करीत आहे, तरी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष लोटून सुद्धा आतापर्यंत खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकार व भारत सरकार दोन्हीही दखल घेत नाही. मग आम्ही भारतीय नागरिक नाही का? असा प्रश्न जिवती तालुक्यातील नागरिकांना भासतो. आमच्या जिवती तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव राजकीय पुढाऱ्यांना फक्त मतदानावेळीच आठवतात. शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन सातबाऱ्याची मागणी करतात, मग आम्हा तालुक्यातील शेतकऱ्याकडे जमिनीचे पटेच नाहीत तर हा लाभ ही आम्हाला मिळत नाही. अशी प्रतिक्रीया विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सुदाम राठोड यांनी विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना दिली.
1) शासनाने तात्काळ तीन पिढ्याची अट रद्द करून जिवती तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीन पट्टे तात्काळ द्या.
2) जिवती येथील ग्रामीण रुग्णालय तात्काळ सुरु करा.
3) जिवती येथे न्यायालय सुरु करा.
4) जिवती येथे बसस्थानक तात्काळ मंजूर करा.
5) जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टीची निधी तात्काळ जमा करा.
6) नगरपंचायत जिवती येथे मंजूर असलेले रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना लाभ देण्यात यावे.
7) जिवती तालुक्याच्या विकास कामासाठी लागणारी वनविभागाची विविध (NOC) अटी रद्द करा.
8) जिवती येथे भारतीय स्टेट बँक शाखा तात्काळ मंजूर करा.
9) नगरपंचायत जिवती येथील पंतप्रधान आवास योजनेतील मंजूर असलेले 664 घरकुल लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी परवानगी तात्काळ देण्यात यावी.
10) जिवती तालुक्यातील अतिक्रमणधारकांना घराचे पट्टे तात्काळ सर्व्हे करून देण्यात यावे.
11) जिवती तालुक्यातील सर्व गाव - तांड्यामध्ये सर्वे करून गावठाणा तात्काळ वाढवून देण्यात यावे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ऍड. वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनाखाली सुदाम राठोड यांच्या नेतृत्वामध्ये शेतकरी जनहिताच्या विविध मागण्यासाठी जिवती तहसील कार्यालयावर शेतकरी जणांक्रोश मोर्चा दि.21-09-23 रोज गुरुवारला दु.01:00 वाजता काढण्यात येत आहे. तरी तालुक्यातील शेतकरी बांधवानी या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने शामिल व्हावे असे आव्हान सुदाम राठोड यांनी केले आहे.
