Top News

On September 18, various organizations on Utnarar street against the contracting-privatization of government jobs. Jan Awach Morcha A. Bh. Support of Sarpanch Parishad.

१८ सप्टेंबरला सरकारी नौकऱ्यांच्या कंत्राटीकरण - खाजगीकरण विरोधात विविध संघटना उतरनार रस्त्यावर. 


जन आक्रोश मोर्चाला अ. भा. सरपंच परिषदेचा पाठिंबा.



 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 



 दिनांक १८ सप्टेंबर २०२३ रोजी राजुरा येथे सरकारी नौकऱ्यांच्या कंत्राटीकरण, खाजगीकरण विरोधात विविध संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. भावी पिढीचे भवितव्य उध्वस्त करणाऱ्या सरकार च्या या निर्णयाविरोधात होणाऱ्या या जन आक्रोश मोर्चाला ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस, कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी समर्थनपत्र देऊन पाठिंबा दिला आहे. 

       तसेच अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने उपविभागीय अधिकारी राजुरा यांना निवेदन देऊन सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यात आला असून यात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील 62000 हजार जि. प. शाळा प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी खाजगी संस्थांना दिल्या जाणार आहे. शिक्षण ही मुलभूत गरज आहे त्यामुळे सदर निर्णय अनाकलनीय आहे शिवाय कर्मचारी भरती करण्याचा अधिकार सुध्दा खाजगी कंपन्यांना दिल्या गेला आहे. थोडक्यात समाजातील विविध प्रवर्गातील आरक्षण ही समाप्त होणार आहे. हे दोन्ही जी आर रद्द करण्यात यावेत अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. आणि सोमवार दिनांक १८ सप्टेंबर ला होणाऱ्या जन आक्रोश मोर्चाला अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य चा जाहीर पाठिंबा दिला आहे.

Previous Post Next Post