Top News

Balharshah police forgot journalists?

बल्हारशाह पोलिसांना पडला पत्रकारांचा विसर ?

 


 विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह 


कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राखण्याची जबाबदारी ही खर्या अर्थाने पोलिस प्रशासनाची असते. गावात होणार्या विविध कार्यक्रमातील बंदोबस्तात प्रामुख्याने पोलिस विभागाची भूमिका महत्त्वाची असते. पत्रकार हा लोकशाहीचा चवथा स्तंभ म्हणून ओळखला जातो समाजातील प्रत्येक चांगल्या वाईट बाबींची आपल्या लेखणी द्वारे समाजासमोर मांडणी करतो अशातच येणाऱ्या आगामी काळात अनेक सण, सोहळा,उत्सव निमित्त दरवर्षी शांतता समिती बैठक घेण्यात येते व या बैठकीला समाजातील प्रत्येक घटकांसह पत्रकारांना सुध्दा बोलाविले जाते मात्र यावर्षी प्रशासनाला स्थानिक पत्रकारांना बोलाविण्याचा विसर पडला की जाणीवपूर्वक डावलण्यात आले असा प्रश्न निर्माण होत आहे. आगामी होवू घातलेल्या विविध सणां निमित्त शांतता समितीची  बैठक  शुक्रवार दि.०१ सप्टेंबरला पोलिस स्टेशन बल्हारशाह येथे पार पडली. 


सदर बैठकीला शहरातील गणमान्य नागरिक व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते, व राजकीय नेते यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. परंतू या बैठकीत स्थानिक पत्रकारांना डावलण्यात आले. या मागचे नेमके कारण काय? अनेकांनी या प्रकारा बाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.पत्रकारांना या महत्वपूर्ण बैठकीत डावलने हा पोलिस प्रशासनाला पडलेला विसर? कि जाणीवपूर्वक केले? असा प्रश्न सध्या बल्हारशाह शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

Previous Post Next Post