युगात्मा शरद जोशी यांच्या जयंतीदिना निमीत्य उद्या 3 सप्टेंबर ला राजुरा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार युगात्मा शरद जोशी यांची जयंती दरवर्षी रक्तदानाने साजरी होते.
यावर्षीही दिनांक 3 सप्टेंबर 2023, रोज रविवारला राजुरा उपजिल्हा रुग्णालया समोर राम मंदीर सभागृहात शेतकरी संघटने तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप करणार असून तालुक्यातील जेष्ठ नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या शिबीरात युवक, कार्यकर्ते, महिला यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आदरणीय शरद जोशी यांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी यांच्या पदाधिका-यांनी केले आहे.
