मौजा मुर्ती - नलफडी येथील नाल्यावर बांधण्यात आलेल्या पूलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे...फेरचौकशी करून नव्याने पुलाचे बांधकाम करा..अन्यथा तीव्र आंदोलन करू. - सुरज नक्कोलवार
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
मौजा मुर्ती ते नलफडी नाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नव्याने पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र सदर बांधकाम निकृष्ट दर्जाचे असुन पुलाच्या नंतर बांधण्यात आलेला डांबरी रस्ता पूर्णपणे खचलेला आहे व रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहे. यामुळे सदर पुलावर अपघात होऊन जिवीतहाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच रस्ता खचलेला असल्याने शाळकरी मुलांना त्या मार्गाने रहदारीस त्रास होत असुन जड वाहनांकरीतासूध्दा रहदारीस अडथडा निर्माण झाला आहे.
सदर काम निकृष्ठ दर्जाचे असल्याने सदर पुलाची चौकशी करून सदर रस्ता दुरुस्त करून देण्यात यावा. जेणेकरून गावकरी जनतेला व शाळकरी मुलांना आपला जिव धोक्यात टाकुन सदर मार्गाने ये जा करावी लागणार नाही.
सदर मागनी लवकरात लवकर पुर्ण करण्यता यावी अन्यथा शिवसेना शाखा मुर्ती तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना शाखा प्रमुख सुरज नक्कोलवार यांनी सार्वजनीक बांधकम उप विभाग राजुरा ला निवेदना मार्फत दिला आहे.



