मूल येथील विज वितरण केंद्रातील सहाय्यक अभियंताचा मनमानी कारभार
शेतातील विज बिल न भरल्यास जडालेला ट्रान्सफाॅर्मर लावून देण्यास दिला नकार....
जिल्ह्याचे पालकमंत्री या प्रकरणाकडे लक्ष घालणार का? शेतकर्यांना न्याय मिळणार का?
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
मिळालेल्या माहितीनुसार मुल येथील अंतरगाव परडवाही शेती शिवारातील ट्रान्सफॉर्मर वर विज पडून सदर ट्रान्सफॉर्मर बंद पडलेले आहे.
मुल शहर येथील विज वितरण केंद्रातील सहाय्यक अभियंता यांना काही शेतकरी वर्ग निवेदन देण्याकरिता गेले असता त्यांनी त्यांना विजेचे पूर्ण बिल भरल्याशिव्याय ट्रान्सफॉर्मर बसवून देणार नाही असे ठनकाऊन सांगीतल्याची माहीती शेतकर्यांनी विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना प्रतिनिधीला दिली.
आधीच शेतकरी वर्ग नापीकीमुळे व पुरामरे संकटात असताना विज वितरण केंद्रातील सहाय्यक अभियंता यांनी शेतकरी वर्गास वेठीस धरले आहे.
या अभियंता च्या मनमानी कारभारा मुळे शेतकरी वर्ग आर्थीक विवेंचनेत सापडला आहे. अश्या प्रसंगी शेकर्यावर आलेल्या या संकटा वेळी जिल्याचे पालकमंत्री या विषया कडे गंभीरतेने लक्ष देणार काय ? शेतकर्यांना न्याय मिळणार का? असा प्रश्न आता शेतकर्यांना पडला आहे.

