Top News

A fire broke out at the office of the Food and Drug Administration Department on the third floor of the administrative building in Chandrapur. Guardian Minister N.Sudhir Mungantiwar ordered the Collector to investigate.....

चंद्रपूरात प्रशासकीय भवनातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाला आग......


पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दीले जिल्हाधिकारी यांना चौकशीचे अदेश.....

विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)

चंद्रपूर शहरातील प्रशासकीय भवनातील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाला  काल दि.६/८/२०२३ ला पहाटे आग लागल्याची खळबळजनक घटना घडली, सकाळ पासून अग्निशमन दलाचे वाहानं आग विझवण्याचा प्रयत्न करत होते मात्र आग आटोक्या बाहेर होती.

सवीस्तर वृत्त असे आहे की,चंद्रपूर शहरातील शासकीय परिसर असलेल्या प्रशासकीय भवनातील तिसऱ्या माळ्यावरील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात आज दिनांक 6 ऑगस्ट च्या पहाटे 3 वाजता पासून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात येताच पोलीसांना सूचना देण्यात आली, पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाला सूचना दिल्या.

महानगरपालिका, सि एस टी पी एस(CSTPS) प्रशासनाच्या अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते परंतु जप्तीत असलेल्या तंबाखू जन्य पदार्थ जळत असल्याने आग आटोक्यात आली नसल्याने आगे नी भीषण रूप घेतले असता संपूर्ण अन्न पुरवठा जळून खाक झाल्याची माहिती मिळाली, आग कशामुळे लागली याचा अद्यापही कारण कळुशकले नाही, घटनेचा अधीक तपास पोलीस करीत आहे.

जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश......

रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर लागलेल्या आगीच्या चौकशीचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर रविवारी पहाटे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचे  कार्यालयाला आग लागली. आगीत कार्यालयातील फाईल्स, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले. ही आग कशामुळे लागली त्याचे नेमके कारण शोधावे तसेच यामागे कोणत्या घातपातीचा तर हात नाही, याचाही शोध यंत्रणेने घ्यावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

पहाटेच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासन कार्यालयातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच तातडीने फायर ब्रिगेडला प्रचारण करण्यात आले. यात फायर ब्रिगेडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे आगीचे लोन इमारतीतील इतर कार्यालयांत पसरले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

Previous Post Next Post