Top News

#Seven_Sister_Hill... Bees attack again in the famous tourist place in Vidarbha; 25 tourists injured...... Tourists demand that the administration take proper measures at the tourist spot......

#Seven_Sister_Hill

विदर्भातील प्रसिद्ध पर्रटन स्थळी पुन्हा मधमाशांचा हल्ला ; २५ पर्यटक जखमी......


प्रशासनाने पर्यटन स्थळी योग्य उपाय योजणा करण्याची पर्यटकांची मागणी...... 



 विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

विदर्भातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सात बहीनींचा डोंगर, पेरजागड हे नागभीड तालुक्यात आहे. या पर्रटन‌स्थळी अनेक शाळा,महाविद्यालय याच्या सहली तथा पर्यटक ट्रेकींग करीता येत असता तर अनेक पर्यटक इथे कुटुंबासह स्वयमाप तथा डब्बा पार्टी करीता,नवस फेडण्या करीता येथे येतात मात्र या ठीकानी पर्यटकांच्या द्रुष्टी कोनातुन उपाय योजणा नाहीत त्या मुळे कनेक पर्यटक पेरजागड ला आल्या वर सुवीधा अभावी नाराजगी व्यक्त करीत असतात, सात बहीनींच डोंगरावर 8 एप्रिलला मधमाशांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर 5 जण गंभीर जखमी झाले होते, या भितीतुन पर्टक सावरत नाही तोच पुन्हा आता बुधवारी नागपूर येथुन आलेल्या पर्यटकांनवर मधमाशांनी ‌हल्ला केल्याची घटना‌ घडली‌ आहे सदर घटनेत 25 पर्यटक जखमी झाले आहेत.

सवीस्तर वृत्त असे आहे की, विदर्भातील प्रसिद्ध असलेल्या नागभीड तालुक्यातील सात बहीनींच डोंगर (Seven sister Hill) येथे आलेल्या पर्यटकावर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात 25 पर्यटक जखमी झाले आहेत. सर्व जखमी पर्रटक हे नागपूर ( #Orange City ) येथील रहिवासी आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. जखमींपैकी काही पर्यटकांची प्रकृती चिंताजनक आहे.

शंकरपूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी अनेक जखमी पर्यटक हे नागपुरात गेलेत. या पूर्वीही मधमाशांच्या हल्ल्याचा अनेकदा घटना सात बहीनींच डोंगर (Seven sister Hill) येथे घडल्या आहेत.

सात बहीनींच डोंगर (Seven sister Hill) येथे या पुर्वी 8 एप्रिलला मधमाशांच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला होता, तर 5 जण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर वनविभागाने येथील प्रवेश बंद केला होता. आवारात मधमाशांच्या अनेक पोळ्या असल्याचे सांगितले जाते.

2013-14 मध्ये एका घटनेत 10 जण गंभीर जखमी झाले होते. मधमाश्यांच्या हल्ल्यात डोंगरावरून खाली पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वीच येथे आलेल्या उमरेड आणि नागपूर येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांना मधमाश्यांनी हल्ला केल्याने बेशुद्धावस्थेत वाचवण्यात आले. गडचिरोलीतील काही पर्यटकांवरही मधमाश्यांनी हल्ला केला होता. 


पर्यटन स्थळी योग्य उपाय योजणा करने गरजेचे...पर्यटकांची मागनी....


 विदर्भातील प्रसिद्ध असलेल्या सात बहीनींच डोंगर (Seven sister Hill) येथे अनेक पर्यटक येत असता विदर्भातील अनेक जिल्हा तुन पर्यटक येथे ट्रेकींग,सहल,स्वयमपाका करीता तर कुनी नवस फेडण्या करीता येथे येत असतात. मात्र सदर पर्यटन स्थळी योग्य उपाय योजना नाही, वर डोनगरावर चढतांना काही पायर्या आहेत त्या खचलेल्या आहेत.पायर्या संपल्यावर मोढ मोढ्या दगडांन वरून चालत जावे लागते अनेक पर्यटक पावसाळ्यात ट्रेकींग करीता येतात पावसा मूळे त्या दगडांन वरून पर्यटक घसरून पडतील या ची भीती नाकारता येत नाही.वर डोनगर चढत असतांना कासी भागात लोखंडी रीलींग आहे मात्र तेही पुरेस्या गडावर नाही.पीन्याच्या पाण्याची व्येवस्था नाही,लाईटांची व्येवस्था नाही. त्या मुळे अनेक पर्यटक या ठीकानी उपाय योजना योग्य नसल्याची नाराजगी व्यक्त करतात, पच्छीम महाराष्ट्रातील पर्यटन स्थळी योग्य उपाय योजना,रोप - वे,पिण्याचे पाणी,मुक्कामा करीता व्यवस्था, लाईटाची व्यस्था अश्या अनेक सुवीधा तीथे असतात मात्र आपल्या विदर्भातील या प्रसिद्ध पर्यटन स्थळा कडे प्रशासनाच लक्ष नाही त्या मुळे येथे भविषात पर्यटक येने कमी होतील असे मत पर्यटकांनी व्यक्त केले आहे. त्या मुळे प्रशासनाने या पर्यटन स्थळा कडे लक्ष देऊन योग्य उपाय योजना कराव्यात जेने करून पर्यटक आणखी वाढतील आणी स्थाणीकांना ही रोजगार उपलब्द होनार असे पर्यटकांचे म्हणने आहे.

Previous Post Next Post