विद्यार्थींबाबत राज्य सरकरा चा मोठा निर्णय, आता पाचवी आणी आठवीला वार्षीक परिक्षा......
आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद..........
शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता, इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. आतापर्यंत आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नव्हते आणि विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात येत होते. मात्र, आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे.
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवी पर्यंत अणुत्तीर्ण करता येत नव्हते. पण आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट 8 वीपर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय बदलण्यात आलाय. पाचवी आणि आठावी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे.
इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनरपरीक्षा विद्यार्थ्यांला पर्याय असणार आहे. पुनरपरीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाणार.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे.
