गोवरी पोवणी एक्सपान्शनचा मार्ग मोकळा.....शिवसेना नेते बबन उरकुडे यांच्या प्रयत्नांना यश.
महसूल विभाग वेकोलीला 2 दिवसात पत्र व्यवहार करणार-तहसीलदार बाहकार
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
गोवरी पोवणी एक्सपान्शन साठी 26 मे रोजी वेकोलीने महसूल विभागाशी सातबाऱ्या संबंधी पत्रव्यवहार केला होता. परंतु महसूल विभागाकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नसल्यामुळे प्रकल्पग्रस्थ चिंतेत होते. शिवसेना विधानसभा समन्वयक तथा एच एम एस युनियन अध्यक्ष बबन उरकुडे यांनी पुढाकार घेऊन आज सर्व प्रकल्पग्रस्थासोबत बैठक लावली आणि तहसील कार्यालय गाठून तहसीलदार बाहकार साहेबांना निवेदन देऊन लक्ष वेधले असता 2 दिवसात सातबारे वेकोलीला पाठवू अशे आश्वासन देण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
याप्रसंगी युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, प्रकल्पग्रस्थ शेतकरी अरुण पाचभाई,प्रतीक कावळे, राकेश जीवतोडे,सुनील पाचभाई,आकाश नादेकर, प्रमोद बोधे, राहुल काळे,समीर इतकेलवार ,तुषार थेरे ,प्रणय भोंगळे ,गणेश उपरे, रुपेश जीवतोड ,शेखर पाचभाई, सुरेंद्र डाहुले ,सुधाकर ढुमणे, रितेश पायपरे ,रुपेश पाचभाई आणि सहकारी उपस्थित होते.

