आषाढी एकादशी व बकरी ईद च्या पार्श्वभुमीवर बल्हारशाह पोलिसांचा पथ संचलन....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
सण, उत्सवांच्या काळात शहर आणि ग्रामीण भागात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने आज दि.28/6/2023 ला शहरातून पोलिसांचा पथसंचलन काढण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौदर्य वृद्धींगत व्हावा यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात बल्हारशाह शहरातून पथ संचलन काढण्यात आला.
शहरातील मुख्य चौक असलेला नगरपरिषद चौक,नवीन बस स्थानक, गणपती वार्ड, गोल पुलिया, जामा मज्जिद, मदिना मज्जित, सातनल पोलिस चौकी वस्ती सह शहरातुन इत्यादी ठीकाणाहुन पोलिस जवानांचा शस्त्र पथ संचलन काढण्यात आला. सदर पथ संचलनाचे नेतृत्व पोलिस निरीक्षक उमेश पाटील,पोलिस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्णे ग्यानेंद्र तिवारी यांनी केले.
शहरातील कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही काळजीपूर्वक लक्ष देणे,शहरातील वाहतुकीस अडथळा होवू नये व आषाढी एकादशी व बकरी ईद दरम्यान शांतता राखण्याचे आवाहन बल्हारशाह पोलिसांनी केले आहे. या वेळी सदर माफ ड्रील व रोड मार्च मध्ये अधीकार्यांसह ३० कर्मचारी सहभागी झाले होते.
