Top News

Come on Yavatmal...Let's Yavatmal....Let's Yavatmal.... Grand march of meritocracy holders at Yavatmal tomorrow..... The challenge of the organizers is to participate in a large number of qualified persons from Maharashtra.

चला यवतमाळ...चला यवतमाळ....चला यवतमाळ....


उद्या यवतमाळ येथे अभियोग्यताधारकांचा भव्य मोर्चा.....


महाराष्ट्रातील अभियोग्यताधारकांनी मोठ्या संखेत सहभागी व्हा आयोजकांचे आव्हान......



विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ 

यवतमाळ येथे अभियोग्यता धारकांचा जिल्हा परिषदवर भव्य धडक आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असुन एकच टप्प्यात शिक्षक भरती 55000 घेण्याच्या मागणी ला घेऊन उद्या दि. 3 जुलै 2023 ला छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून सकाळी 11:00 वाजता मौर्चाला सुरवात होनार आहे.

भारतातील विशाल काय महा राज्या पैकी एक भारताची आर्थिक राजधानी असलेले राज्य या तुलनेने विचार केल्यास आज महाराष्ट्र राज्यातील शिक्षणाचा स्तराचा विचार केलास तो दिवसें दिवस घालवत चालला असल्याच आयोजकांच म्हण आहे.



आंदोलकांची कारण पुढील प्रमाणे :- 

 1 पुरेशी शाळा विद्यार्थ्यांच्या प्रमाणात उपलब्ध नाही.

2 व्यवस्थित इमारती नाही.

3 पिण्यायोग पाणी नाही.

4 शौचालयाची व्यवस्था नाही.

5 पुरेशी सुविधा नाही.

6 लॅब नाही.

7 मुलांना गणवेश नाही.

8 मध्यान भोजन नाही आणि या उपरी सांगायचं झाल्यास वरती वर्ग शिक्षक नाही.

समाज रचनेतील महत्त्वाचा घटक म्हणून आपण शाळेकडे बघतो आणि शाळा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र येते ते म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक. पण आज महाराष्ट्र या विशाल काय राज्यांमध्ये प्रतिवर्ग आपण शिक्षक उपलब्ध करून देऊ शकत नाही, ही किती मोठी शोकांतिका आहे. याला जबाबदार जर कोण असेल तर आजची शासन व्यवस्था आणि त्यांचे धोरण आणि सर्व धोरण माहित असून गप्प बसणारे पालक आणि अभियोग्यताधारन केलेले शिक्षक.

   सदर मोर्चा ची गरज काय ????

  या प्रश्नाचे उत्तर सांगायचे झालास आज ज्या घडामोडी डोळ्यासमोर घडत आहे  याचे उदाहरण आपणा सर्वांना माहीतच आहे. वर्ग आहे मुलं आहे मात्र शिक्षक नाही आणि म्हणून सदर मोर्चाचे आयोजन हे यवतमाळ जिल्हा अभियोग्यताधारक यांच्या वतीने आयोजित केला असून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अभियोग्यताधारक लाखोच्या संख्येने यवतमाळ येथे उपस्थित राहणार आहे.

यासाठी यवतमाळ जिल्ह्यात सर्व पालक व अभियोग्यताधारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, सदर मोर्चात आपण उपस्थित राहावे आणि धरणे देण्यात सुद्धा सक्रिय सहभागी व्हावे. या विशाल काय मोर्चा आणि धरणे यांची रूपरेषा पुढील प्रमाणे आहे.

 

दिनांक 03/07/2023 वार सोमवार सकाळी 11.00  वाजता स्थळ

छक्षपती शिवाजी महाराज मैदान यवतमाळ येथून हा मोर्चा विशाल रूप धारण करून जिल्हा परिषद यवतमाळ येथे जाऊन धडकणार आहे, आणि जोपर्यंत 55000 शिक्षक भरती करत नाही तोपर्यंत धरणे धरण्यात येणार आहे.

याचे परिणाम स्वरूप आपल्या सर्व अभियोग्यताधारकांना नोकरी मिळणार पण या उपरी आपल्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना उत्तम गुणवतापूर्ण दर्जेदार सर्व गुण संपन्न शिक्षक मिळणार.

   

 हा त्या मुलांचा हक्क त्यांना मिळून देऊया

 ""चला एकत्र लढूया आणि जिंकूया हक्काची लढाई""

   आयोजक 

  यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्रातील अभियोग्यता धारक

Previous Post Next Post