घुग्घुस येथे राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन अभियान साजरा......
विदर्भ माझा न्युज 24 - घुग्घुस
सिकलसेल ऍनिमिया या भयावह रोगाविषयी जागृती निर्माण व्हावी, या बिमारीचे दुष्परिणाम लोकांना माहिती व्हावी या हेतूने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ०१ जुलै रोजी मध्यप्रदेशातील शहडोल येथे राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन अभियानाचे उद्घाटन केले, त्याअनुषंगाने घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन अभियान साजरा करण्यात आला.
यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभियानात सिकलसेल बाधित रूग्णांना रेड कार्डचे वाटप करण्यात आले तसेच नागरिकांनी या बिमारीविषयी विशेष काळजी घेण्याचे उपस्थित डॉक्टरांनी आवाहन केले या रोगाच्या निर्मूलनाकरिता शासनाने विविध स्तरावर मोफत सुविधा व उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
या अभियानात संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती जि.प.चंद्रपूर ब्रिजभूषण पाझारे, प्राथमिक आरोग्य केंद्र घुग्घुस आरोग्य अधिकारी डॉ. कुंडू , डॉ. सोनटक्के , डॉ. गर्गीलवार तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

