कोतवाल भरती परीक्षा पारदर्शक न झाल्यामुळे पदभरती रद्द करावी : परीक्षार्थी विद्यार्थी
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
बेरोजगारीने त्रस्त असलेल्या अभ्यासु विद्यार्थ्यांना कोतवाल भरती पारदर्शक होईल असे वाटले होते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले मात्र दिनांक 15/06/2023 रोजी कोतवाल भरती करिता नागभीड येथील गोविंद राव वारजूकर महाविद्यालय येथे पेपर घेण्यात आला होता.
त्यावेळी पेपरमध्ये पारदर्शक्ता राहावी या करिता सेंटरमध्ये कुठलेही मोबाईल,घड्याळ, व इत्यादी साधन घेऊन जाण्यास बंदी होती, परंतु परीक्षा रूम मध्ये विद्यार्थी बसले असता विद्यार्थ्यांना देण्यात आलेले उत्तर पत्रिकेसह प्रश्नपत्रिका संच सिलबंद पॉकेटमध्ये नव्हती, त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांच्या सहिनीशी पेपर संचाचा सील उघडण्यात आलेला नाही, आजपावेतो झालेल्या कुठल्याही पदभरती मध्ये पेपरसंच हा सील बंद असतो, परंतु इथे पेपरसंच सिलबंद नसल्यामुळे पारदर्शकता राहलेली नसल्याचा आरोप विद्यार्थींनी जिल्हा अधीकार्यांना तहसीलदार नागभीड यांच्या मार्फत दीलेल्या निवेदनात केला आहे.
तर सदर कोतवाल भरती परीक्षा रद्द करीत पुनश्च कोतवाल भरतीचे पारदर्शक रित्या पेपर घेण्यात यावे, या करीता परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन दिले. सदर निवेदन देते वेळी अश्विन मेश्राम, धीरज अलोने, फिरोज बन्सोड, देवेंद्र गेडाम, सुजित अलोने, संगम गेडाम, रेवनाथ बोरकुटे, विलास बोरकुटे, आनंद भुजाडे, भूषण धोटेकर, रजत गजभिये, समीर गेडाम हे परीक्षार्थी उपस्थित होते.
