Top News

Until the gram sevak does not give the account, the people took a stand to close this gram panchayat office.....

ग्रामसेवक हिशोब देत नाही तो पर्यंत हे ग्राम पंचायत कार्यालय बंद जनतेंनी घेतला पवित्रा.....


आसापूर ग्रामसेवकाचा मनमानी कारभार, जनता त्रस्त.....


प्रत्येक  ग्रामसभेला राहतोय ग्राम सेवक गैरहजर  - गावकऱ्यांचा आरोप....



 विदर्भ माझा न्युज 24 - जिवती  

 चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातील जिवती तालुक्या अंतर्गत येत असलेल्या आसापूर ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक आदे यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 

सदरहु  ग्रामसेवकानी दि. ०३ मार्च २०२३ ला ग्राम पंचायतचा  हिशोब देतो म्हणून कबुली दिली होती, त्या नंतर १० मे २०२३ ला ग्रामसभा ठेवण्यात आली, त्यात सुद्धा ग्रामसेवक आदे यांनी हिशोब सादर केला नाही. तब्येतीचे कारण सांगून ते या सभेला गैरहजर राहीले नंतर तीच ग्रामसभा 31 मे ला ठेवण्यात आली त्या वेळेस सुद्धा ते स्वतः हजर झाले नाही, दि.19 जून च्या सभेला ते हजर राहिले पण त्यांनी हिशोब दिला नाही. शेवटी संतापलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुलूप लावले. 

अश्या पळवाटा काढणाऱ्या ग्रामसेवकावर कठोर कारवाई होणे गरजेचे व आवश्यक असल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे. जो पर्यंत हे ग्रामसेवक हिशोब देत नाही तो पर्यंत हे ग्राम पंचायत कार्यालय बंद राहील असा पवित्रा स्थानिक जनतेंनी घेतला आहे. 

या कामचुकार ग्रामसेवकास  निलंबित  करण्यात यावे अशी  मागणी ग्रामसभेला उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते सुदाम राठोड, सरपंच मंगेश सोयाम, उपसरपंच लचु सोयाम, गोचू पेंदोर, जिजाबाई चव्हाण, लक्ष्मीबाई राठोड, माधव सोयाम, किसन जाधव, संभाजी वारे, बाबू पवार, सुधाकर जाधव, विजय चव्हाण ,बालू जाधव, भुजंगराव मडावी, पैकु सोयाम, संदीप आत्राम, रमेश पवार, व्यंकटी जाधव यांच्यासह गावातील जनतेंनी केलेली आहे.

Previous Post Next Post