विदर्भात शेतकरी आत्महत्या काही थांबे ना........
सततच्या नापीकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून शेकर्याने संपवीली जिवन यात्रा......
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
विदर्भात शेतकरी आत्महत्या काही थांबे ना? सतत होनार्या नापीकी व कर्जबाजारी पाई शेतकर्यांच्या आत्महत्या विदर्भात वाढतच चाल्या आहेत, विदर्भातील यवतमाळ जिल्हातील आर्णी तालुका येथील पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत व सावळी सदोबा लगत असलेल्या मौजा पाळोदी येथील शेतकरी सततच्या नापीकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून वाहत्या नदी च्या प्रवाहामध्ये आत्महत्या केली असून मृतक शेतकरी संजय सूर्यभान जाधव वय ५० वर्ष असून कुटुंबात असलेल्या चार मुलींचे लग्न करून हवालदिल झालेला व त्याना एक मुलगा असा मोठा परिवार असून त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे.
शेतीवरील पीक कर्ज दरवर्षी फेडता फिटेना त्यांच्या नावाने असलेले बॅकेचे कर्ज मुलं बाळाच्या शिक्षणाचा खर्च व घराचा गाडा चालवीत असतांना अनेक संकटाला संजय सामोर जात असतांना सतत होणारी नापी की व कर्जबाजारीपणामुळे तो पूर्णतः खचून गेलेला होता त्याच कारणाने संजय याने काल नदीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपवली त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज असल्याचे समजते कुटुंबातील कमावता व्यक्ती गेल्याने त्या कुटुंबातला आधारवडा कर्ता पुरुष गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
