Top News

Farmers are the backbone of the world, agriculture should be prosperous, farmers should promote dairy business and production of new crops. - MLA Vijay Wadettiwar

शेतकरी हाच जगाचा पोशिंदा,शेती सुजलाम सुफलाम व्हावी,शेतकऱ्यांनी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय व नवीन पिकांच्या उत्पादनाला चालना द्यावी. - आमदार विजय वडेट्टीवार




 विदर्भ माझा न्युज 24 - सावली 



        गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भेडसवणाऱ्या  विविध समस्यांचा निपटारा व्हावा यासाठी माजी कॅबिनेट मंत्री (म.रा) तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र,विजय वडेट्टीवार  यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तक्रार निवारण सभा तालुक्यातील मौजा व्याहाड खुर्द, येथे सावली तालुका काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित केली होती.

  या तक्रार निवारण सभेचे मुख्य विषय :-

१.पाणी उपलब्धतेबाबतच्या सर्व समस्या निकाली लावणे २.प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला मिळणेबाबत तसेंच ३.शेतकऱ्यांकडून सभेप्रसंगी विषयान्वये वेळेवर येणाऱ्या सुचना व तक्रारी.हे प्रमुख विषय ठेवण्यात आले होते.


या तक्रार निवारण सभेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी बांधकाम सभापती जि.प. दिनेश पाटील चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिवराज पाटील शेरकी, उपसभापती दिवाकर भांडेकर, माजी प.स.सभापती विजय कोरेवार,व्याहाड खुर्दच्या सरपंच सौ.सुनीता उरकुडे,उपसरपंच भावना बीके,सेवा सोसायटी अध्यक्ष दीपक पाटील जवादे ,युवा सामाजिक कार्यकर्ता व संचालक कृषी बाजार समिती सावली निखिल सुरमवार,माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य केशव भरडकर,युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे,माजी तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस आशिष मंबतुलवार,काँग्रेस कार्यकर्ता अनिल पाटील मशाखेतरी व सुनिल बोमणवार तसेच आयोजित सभेस गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचा समस्या तातडीने निकाली काढण्याकरिता गोसेखुर्द प्रकल्पाचे प्रमुख कार्यकारी अभियंता राजेश सोनवणे,जितेंद्र तुरखळे,संदीप हासे तसेच पोलीस विभागातर्फे सावलीचे पोलिस निरीक्षक आशिष बोरकर व संबंधित विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील शेतकऱ्यांचा समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आमदार वडेट्टीवार यांनी सूचना दिल्या.


       अध्यक्ष स्थानावरून बोलताना राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, सावली तालुक्यातील जनतेला घोसेखुर्द प्रकल्प आल्याने हजारो हेक्टर जमिनीला त्याचा फायदा झाला.मी राज्यमंत्री असताना सोनिया गांधी व पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे घोसेखुर्द प्रकल्पचा मुद्दा मांडला,गोसेखुर्द हा राज्यस्तरीय प्रकल्प बहुउद्देशीय महत्वाचे असल्याने त्याला राष्ट्रीय प्रकल्प घोषित करून अवघ्या दीड- दोन महिन्यात या प्रकल्पाला ५००० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला.


                  शेतकऱ्यांवर आत्महतेची वेळ येऊ नये,त्यांचा जमिनी सुजलाम सुफलाम व्हाव्यात. त्यासाठी शेतकऱ्यांना शेती पाणी भेटणे आवश्यक आहे, अंडर ग्राऊंड प्रणालीद्वारे तालुक्यातील ७५% शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे काम चालू असून उर्वरित २५% काम पूर्णत्वास येत आहे.चंद्रपूर जिल्ह्याला आणखी ५०० कोटी रुपयांची आवश्यकता असून आपल्या भागात २५%  लोकांना दुबार पेरणीसाठी पाणी पुरवले जाणार त्यासाठी मी प्रयत्नशील आहे.



शेतकऱ्यांनी समंजस्याची भूमिका घेऊन एकमेकाला सहाय्य केले पाहिजे.शेतकऱ्यांनी २ वर्षात धान नाही पिकवले तरी देशात उपलब्ध भरपूर साठा आहे. नव-नवीन पिके घेण्याचे धाडस शेतकऱ्यांनी करावे, शेतीपूरक दुग्ध व्यवसायला चालना दीली पाहिजे, आपल्या भागात लवकरच नवीन प्रकल्प होणार आहेत त्यांचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल गुरुनुले तर आभार जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम यांनी मानले.




Previous Post Next Post