Top News

MP Dhanorkaran Parthiv entered Varora house... The photo of his father taking his last darshan became the last photo of his public life.....

खासदार धानोरकरांच पार्थीव वरोरा येथील घरी दाखल......


वडिलांचे अंतिम दर्शन घेतांनाचा फोटो सार्वजनिक जीवनातील अखेरचा फोटो ठरला.....




विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)

काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज उपचारादरम्यान दिल्ली येथे निधन झाले. ते अवघ्या 48 वर्षांचे होते. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मावळली. 



 मागील दोन दिवसांपासून बाळू धानोरकर व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे कुटुंबिय देखील दिल्लीत दाखल झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती काल मिळत होती. मात्र आज पहाटे 2 वाजेच्या सुमारास त्यांच्या निधनाची माहिती समोर आली. दिल्ली वरून त्यांच पार्थीव एयर ॲंबुलंस ने नागपूर विमानतळी आनण्यात आले,

 नागपूर वरुन खा. बाळू धानोरकर यांचं पार्थिव घेऊन रुग्णवाहिका वरोऱ्याला रवाना झाली होती. आ. प्रतिभा धानोरकर यांच्यासोबत शिवानी वडेट्टीवारही वरोऱ्याला रवाना झाल्या होत्या. 

खा. बाळू धानोरकर यांचं पार्थिव वरोऱ्यात दाखल झाले असून वरोऱ्यातील घरी खासदार धानोरकरांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येनार आहे. जिल्ह्यातील व राज्यातील नेते पदाधिकारी व कार्यकर्ते अंत्यदर्शनासाठी वरोरा येथे दाखल होनार आहे.


वडिलांच्या अंतिमदर्शनाचा फोटो ठरला खासदार बाळू धानोरकरांचा अखेरचा फोटो......




आर्णी लोकसभा क्षेत्राचे महाराष्ट्रातील कॉग्रेसचे एकमेव खासदार बाळु धानोरकर यांचा वडिलांचे अंतिम दर्शन घेतांनाचा सार्वजनिक जीवनातील फोटो अखेरचा फोटो  ठरला.

खासदार बाळू धानोरकर यांचे वडील सेवानिवृत्त जि. प. मुख्याध्यापक नारायणराव धानोरकर यांचे नागपूर येथे वृध्दापकाळाने तीन दिवसापूर्वी (२७ मे २०२३) निधन झाले. प्रकृती स्वास्थ्यामुळे खासदार धानोरकरही दवाखान्यात भरती होते. खासदार बाळू धानोरकर हे वडिलांचे निधन झाल्याचे कळताच दवाखान्यातच त्यांनी आपल्या वडिलांचे अंतिम दर्शन घेतले होते. प्रकृतीमुळे वडिलांच्या अंतिमसंस्काराला खासदार धानोरकरांना उपस्थित राहता आले नाही.

खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नागपूर येथून त्यांना दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू झाले. प्रकृतीवर सुधारणा होत असतांना अचानक त्यांची आज ३० मे २०२३ ला पहाटे २.३० वाजाता प्राणज्योत मालवली. एका क्षणात ते आपणा सर्वांना पोरके करून गेलेत. त्यांनी अचानक घेतलेली एक्झीट मनाला चटका लावून देणारी ठरली.

शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता ते खासदार हा बाळूभाऊचा प्रवास थक्क करून सोडणारा आहे. भाऊंनी शिवसेना कार्यकर्ता, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, जिल्हाप्रमुख, आमदार, खासदार अशी चढत्या क्रमाने पदे भुषविली आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक विकासकामे मार्गी लावलीत.

Previous Post Next Post