चंद्रपूर महामार्ग पोलीसांचा अनोखा उपक्रम......
वाहनधारकांना शरबत वाटप करून केले वाहतूकी संबंधित मार्गदर्शन.....
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
आज दि.२७ ला चंद्रपूर महामार्ग पोलीसांच्या वतीने चंद्रपूर - नागपूर महामार्गांवर वाहन धारकांना थांबवून प्रत्येक वाहन धारकांस शरबत वितरित करण्यात आले.
हा उपक्रम आज जिल्हात चर्चेचा विषय बनला आहे, नेहमी वाहतुक पोलिस मंटल कींवा दुरुन वाहतुक पोलिस दिसले जरी तरी वाहन धारकांच्या मनात धासकी भरते, हि धासकी येवढ्यासाठीच की आपन कुठ नियम चुकलो तर नाही? आपल्याला दंड भरावा तर लागनार नाही ना? या अश्या भीतीने अनेक वाहन धारकांना वाहतुक पोलिस दिस्ताच मनात धासकी भरते.
मात्र आज चंद्रपूर महामार्ग पोलिसांच्या वतीने एक अनोखा उपक्रम करून वाहनधारकांच्या मनात भरनारी धासकी दुर करण्याचा व तसेच वाहन धारकांना वाहतुकी चे नियण समाजावून सांगण्याचा एक अनोखा प्रयत्न करण्यात आला.
प्रत्येक दुचाकी व चारचाकी, ट्रान्सपोर्ट वाहन, बसेस अश्या सर्व प्रकारच्या वाहन धारकांना वाहन चालवीण्याचे नियम, कायदे मोटर वाहन कायदयाबाबत मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आले.
या वेळी महामार्ग पोलीस चंद्रपूर चें
पोलीस उपनिरीक्षक गौरकार, पोलीस उपनिरीक्षण शेख, गेडाम, हेड कॉन्स्टेबल काशिनाथ निगोट, चंपालाल राजपूत, प्रमोद भिसे, प्रवीण बोन्डे इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत शरबत वितरण व मार्गदर्शन तथा प्रबोधन कार्यक्रम घेण्यात आला.




