चंद्रपूर जिल्हाचे राजकारण तापनार ? भारत राष्ट्र समिती पार्टीचे चंद्रपूरात प्रवेश........
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
तेलंगाणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी तद्वतच चंद्रपूर जिल्ह्याच्या कायापालट करण्यासाठी भारत राष्ट्र समिती पार्टी चे महाराष्ट्रात आगमन केले आहे.
तेलंगाणा चे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे कार्य तेलंगाणा राज्यातील जनतेसाठी उल्लेखनीय असल्याचा दावा बीआरएस पार्टी करीत आहे.
तेलंगानाचे मुख्यमंत्री के.सी. आर. यांनी नुकतेच जाहिर केले आहे की येणाऱ्या निवडणुकीत यंदा महाराष्ट्रात BRS पार्टी (भारत राष्ट्र समिति) या नावाने विधान सभा, लोकसभा, महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितित आपले उमेदवार उभे करणार, त्या अनुषंगाने परवा नागपुरात एका विशिष्ट मंडळाची बैठक पार पडली. यात चंद्रपुर जिल्हा इंचार्ज पदी वामसी कृष्णा अरिकीला यांची नियुक्ति करण्यात आली आहे.
चंद्रपूर जिल्हा इंचार्ज नियुक्ति नंतर आता चंद्रपुर जिल्हयात लोकांची संवाद साधने कार्यकर्ता जोड़ने, निवडणुकीत जिंकून येणारे सक्षम उमेदवार, काम करणारे सक्षम कार्यकर्ते यांची पाहणी करुण BRS पार्टीला चंद्रपुरात मजबूत करुण नागरिकांच्या मूलभूत सुविधा त्यांच्या पर्यंत कसे देता येईल या कड़े लक्ष देणार असल्याचे आज आयोजित श्रमिक पत्रकार पत्रपरिषदेत जिल्हा इंचार्ज वामसी कृष्णा अरिकीला यांनी माहिती दिली.
नांदेड़ नंतर चंद्रपुरातही अनेक कार्यकर्ता BRS पार्टी सोबत जुड़त आहे आणि केसीआर यांची प्रसिद्धी व लोकप्रियता बघता असंख्य कार्यकर्ते जुडणार अशी आशा व्यक्त केली.
यावेळी आनंदराव अंगलवार, एड. संतोष कुळमेथे, नरेंद्र मडावी, वासुदेव मुक्ती, आतिफ खान, शाहरुख खान व देवेंद्र लोणकर यांची उपस्थिती होती.
