Top News

jamni yethe bharat ratn mahamanav dr. babasaheb ambedkar ani krantisurya mahatma jyotiba fhule yanchi sayukt jayanti sajari

जामणी येथे भारत रत्न‌ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती साजरी........



 विदर्भ माझा न्युज 24 - जामणी 


जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामणी इथे आज दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी भारत रत्न‌ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले या दोन्ही महामानवांच्या जयंतीच्या संयुक्त पणे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळा सुधार समितीचे उपाध्यक्ष प्रमोद मंचलवार, समितीचे सदस्य सुनील काटकर, संतोष वाघाडे, ज्येष्ठ नागरिक नरसोजी कोडापे,


यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्र झरी शाखेचे उप व्यवस्थापक कमलेश माहोरे तसेच कृषी विभागातील अधिकारी भुजाडे  या मान्यवरांनी आपली प्रमुख उपस्थिती दर्शवली. 

तसेच शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी दोनी महापुरुषांच्या कार्याची महती सर्वाना सांगितली. कार्यक्रमाची सांगता शाळेचे मुख्याध्यापक मडावी सर  यांनी आपल्या भाषणातून केली.

Previous Post Next Post