Top News

The only cinema hall of Bramhapuri city burnt to ashes.......loss of lakhs.......

ब्रम्हपुरी शहरातील एकमेव असलेला सिनेमाग्रुह आगीत जळूण राख.......लाखोंचे नुकसान.......




विदर्भ माझा न्युज 24 - ब्रम्हपूरी

चंद्रपूर जिल्हात सद्या उष्णता दिवसेन दिवस वाढत चाली आहे, अनेक ठीकानी उष्णतेने दर वर्षी आग लागुन अनेकांचे नुकसान होत असते त्यातच या वर्षी दि.२०/४/२०२३ ला ब्रम्हपूरी शहरातील एकमेव सीनेमाग्रुह असलेल्या अलंकार सिनेमागृह आगीत जळुन राख झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत लाखोंचे माल जळूण राख झाल्याने सिनेमागृह मालकाचे लाखोंचे नुकसान झाले आहे मात्र नेमकी ही आग कश्या मुळे लागली हे अध्याप कळु शकले नाही.

सवीस्तर वृत्त असे आहे की, ब्रम्हपुरी शहरातील अलंकार सिनेमागृह जळून बेचिराख झाले आहे. आगीत सिनेमागृह मधील सर्व साहित्य जळाल्याने लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील एकमेव अलंकार सिनेमागृह आरमोरी मार्गावर आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सिनेमा गृहाला आग लागून संपूर्ण सिनेमागृहातील साहित्य जळून खाक झाले. 




समोरील लोखंडी दार कुलूप लावून बंद करण्यात आले होते. आत जाण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याचे मालकाचे व कर्मचार्यांचे म्हनणे आहे. सकाळी दहा वाजताच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांनी दार उघडून आत प्रवेश केला असता सदर प्रकार निदर्शनात आला.

मशीन, पडदा, पडद्यामागील साऊंड, इलेक्ट्रिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याने मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असुन. दरम्यान ही आग नेमकी कशी लागली हे अध्याप कळु शकले नाही. आगीचे कारण अध्याप गुलदसत्यात आहे, नेमकी आग कश्यामुळे  लागली, उष्णतेमुळे आग लागली की शाॅर्ट सर्कीट मुळे, की कुशी‌जानूण लावली हे अध्यापही कळु शकले नाही सदर घटनेचा अधीक तपास ब्रम्हपुरी पोलिस करीत आहे.

Previous Post Next Post