Breaking news.....नक्षलवाद्यांच्या हल्यात 11 जवान शहीद.....नक्षल्यांनी IED स्पोट घडवला.....
दोन्ही बाजुंनी चकमक सुरु...घटना स्थळी अधीक पोलिस बळ पाठवण्यात आले.....
छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ११ जवान शहीद झाल्याची माहिती आहे. हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिला आहे.
विदर्भ माझा न्युज 24 - दंतेवाडा
छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित दंतेवाडा जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ जवान शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात हे जवान शहीद झाले आहेत. एएनआयने हे वृत्त दिले आहे.
छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूरजवळ ही घटना घडली. नक्षलवाद्यांनी रस्त्यात पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. याच रस्त्यावरून छत्तीसगडच्या पोलिसांचे वाहन जात होते. यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवला. यात स्फोटात छत्तीसगडच्या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे ११ जवान शहीद झाले आहेत.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याबाबत माहिती दिली आहे. नक्षलवादी हल्ला झाल्याची माहिती आहे. अतिशय दुःखद घटना आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण पन सहभागी आहोत. ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे. हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिला आहे.
छत्तीसगड-दंतेवाडा स्फोट, शहीद झालेल्या पोलीस जवानांचे नाव...
१) जोगा सुडी
२) मुन्ना राम कडती
३) संतोष तामो
४) दुल्गो मण्डावी
५) लखमु मरकाम
६) जोगा कवासी
७) हरिराम मण्डावी
८) राजु करटम
९) जयराम पेडियाम
१०) जगदिश कवासी
११) धनीराम कवासी चालक सिविलियन
दंतेवाडा भू सुरुंग स्फोट, छत्तीसगड गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया......
छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यातील पालनार जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी भू सुरंग स्फोट घडविला
आरनपूर जंगल परिसरातून कोमिंग ऑपरेशन करून परत येत असताना हा भू सुरंग स्फोट घडविण्यात आलाय,
यात आमचे दहा पोलीस जवान व एक सिविलियन चालक शहीद झाले,
या चार वर्षात 60% नक्षलवाद संपविण्यात आम्ही यशस्वी झालो,
या घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात आली असून काही बाबी गुपित रहावे म्हणून मी सविस्तर बोलू शकत नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात बदल होण्याची शक्यता....
दंतेवाडा हल्ल्यानंतर अमित शहा यांच्याकडून घेतला जातोय आढावा
आज पासून दोन दिवस अमित शहा यांचा नियोजित नागपूर दौरा
अद्यापही नागपूर दौऱ्याबाबत संभ्रम
दोन्ही बाजूंनी चकमक सुरुच......घटनास्थळी अधीक पोलिस बळ पाठवीण्यात आले.....
छत्तीसगड दंतेवाडा जिल्ह्यात भू सुरंग स्फोटात 10 जवान व 1 चालक शहीद
दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पालनार मार्गावर नक्षलवाद्यांनी मोठा भू सुरंग स्फोट घडविला
काल रात्री आलेल्या पावसामुळे काही जवानांना या भागातील जंगलात अडकले होते,
या जवानांना आणण्यासाठी DRG चा एक पथक अरनपुर पालनार या मार्गावर जात असताना नक्षलवाघांनी भू सुरंग स्फोट घडविला
दोन्ही बाजूंनी चकमक सुरू असून या ठिकाणी अधिक पोलीस बल पाठवण्यात आले अशी माहिती पोलीस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी यांनी दिली
.jpg)
.jpg)


.jpg)