Top News

A dead body of an unidentified man was found 200 feet deep in the forest near Borda-Vaigaon road, 20 km from Chandrapur. Ramnagar Police's Challenge of Identity Proof........

चंद्रपूर पासुन २० कीमी अंतरावर बोर्डा - वायगाव रोड लगत जंगलात २०० फुट आत आढळला  एका अनोळखी इसमाचा मृत देह.............


ओळख पटवीन्याचे रामनगर पोलिसांचे आव्हान........




 विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर) 

 चंद्रपूर पासून अंदाजे २० किमी अंतरावर बोर्डा - वायगाव रोड वर तामगाडगे फार्म हाऊस समोर रोड पासून अंदाजे २०० फूट अंतरावर जंगलात अनोळखी इसम मृतक अवस्थेत मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

नेमका त्या इसमाचा मृत्यु कसा झाला हे अध्यप अस्पष्ट आहे, सदर घटनेचा अधीक तपास रामनगर पोलिस करीत असुन इसमाचे अंगात लाल हाफ पँट व ली कूपर लिहिलेला टी शर्ट घातलेला आहे. 

सदर इसमाचे वय अंदाजे ३५-४० वर्ष आहे. त्याचे केस गळाले असून  शरीरफुगले आहे व शरीरावर किडे पडलेले असल्याने त्यावरून ३/४ दिवसापूर्वी मरण पावलेला असावा प्राथमीळ अंदाज आहे. अशा प्रकारचे वर्णन असलेले ईसम बाबत कोणाकडे मिसिंग असल्यास व माहीती असल्यास पोलिस स्टेशन रामनगर येथे कळवान्याचे आव्हान रामनगर पोलिसांनी केले आहे.

Previous Post Next Post