विदर्भात काल पासुन भिमगड येथे भिमालपेन जन्मोत्सव जत्रेला सुरवात.......
प्रशासन व देवस्थान पंच कमेटी जन्मोउत्सव जत्रेसाठी सज्ज...
10 दिवस चालणार जत्रा.......
विदर्भ माझा न्युज 24 - पारशिवनी
विदर्भातील नागपुर जिल्हातील पारशिवनी तालुक्यातील भिमगड येथे आदिवासी समाजाचे आराध्य कुलदैवत भिमालपेन जन्मोत्सव जत्रेचा शुभारंभ काल दि.६ एप्रिल २०२३ ला झाला.
👉🏻 येथे क्लीक करा - भिमालपेन जयंती स्पेशल
काल ६ एप्रिल हनुमान जन्मोत्सव पासून भिमालपेन जन्मोत्सवाचा शुभारंभ झाला असून प्रशासन व देवस्थान पंचकमेटी तर्फे सर्वतोपरी तयारी झाली आहे.
👉🏻 येथे क्लीक करा - भिमालपेन जयंती स्पेशल
यासाठी प्रशासन व यात्रा उत्सव समितीही सज्ज झाली आहे.सदर यात्रा ६ अप्रैल ते १६ एप्रिल दहा दिवस चालणार आहे.
👉🏻 येथे क्लीक करा - भिमालपेन जयंती स्पेशल
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील भिमगड येथे कुवारा भिवसेन मंदिर आहे. तेथे दरवर्षी मध्य भारतातील गोंड व अन्य आदिवासी समाज आणि इतकेच काय तर हिंदू भाविकांची पावलेही चैत्र महिन्यात या मंदिराची वाट पाहत असतात........
👉🏻 येथे क्लीक करा - भिमालपेन जयंती स्पेशल
गोंड आदिवासीचे चौथे धर्मगुरू(मुठवाल) असलेले कुंवारा भिमालपेन मित्रसेन बाबा यांचा हा जपतीचा काळ असल्याने त्यांच्या या मंदिराकडे चैत्र महिन्यात दररोजच हजारो भाविक दर्शनासाठी जात असतात.
येथे क्लीक करा - भिमालपेन जयंती स्पेशल
६ अप्रैल पासुन १६ अप्रैल पर्यत जनोत्सव जत्रा भरते येथे मनातील इच्छा पूर्ण झालेले भाविक येथे वेगवेगळ्या स्वरूपाचे उत्सव साजरे करीत असतात.यात ढोल वाजवून नृत्य करणे,जनावरांचा बळी देणे आणि मांसाहाराचे जेवण शिजवून ते प्रसाद म्हणून खाणे आदी परपरांचा यात समावेश आहे.
👉🏻 येथे क्लीक करा - भिमालपेन जयंती स्पेशल
या मंदिरात चैत्र महिन्यात भव्य भिमाल पेन जन्मोत्सव जत्रा भरत असते. पहील्या दिवसी आदिवासी यांचे आराध्य देवत भिमालपेन यांचे जन्मोत्सव कुवारा भिवसेन देवस्थान( भिमालपेन ठाणा) भिमगड येथे भव्य जत्रेचा आयोजनाच्या पहिल्या दिवसी काल सर्व प्रथम सकाळी आराध्य दैवत भिमालपेन यांचे अभिषेक करून वस्त्र अपर्ण केली गेली व विधिवत झेंडा वंदन करून सकाळी ११:०० वाजता महापुजा केली गेली.
👉🏻 येथे क्लीक करा - भिमालपेन जयंती स्पेशल
काल ६ एप्रिल २०२३ पासून दहा दिवसिय जत्रेचा प्रारंभ झाला आहे. अशी माहीती देवस्थान भिमगड पंचकमेटीचे अध्यक्ष शांताराम जयसिंग मडावी,सचिव गजानन महादेव अत्राम,विश्वस्त सदस्य शंकरराव मरसकोल्हे,रूपराव बोरकर तसेच देवस्थानचे पुजारी शंकर अलापो यांनी दिली आहे.
👉🏻 येथे क्लीक करा - भिमालपेन जयंती स्पेशल
पेंच जलाशयाच्या किनाऱ्यावर असलेल्या या मंदिरातील जत्रेच्या काळात महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशातुन हजारो भाविक येथे येत असतात. पारशिवनी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील व पेंच जलाशयाच्या काठावर भिमगड येथे बसलेले कुंवारा भिवसेन हे तिर्थक्षेत्र सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलव्याप्त निसर्गाच्या सानिध्यात बसलेले आहे.
👉🏻 येथे क्लीक करा - भिमालपेन जयंती स्पेशल
कुंवारा भिवसेन हे तिर्थक्षेत्रात विदर्भ महाराष्ट्रासह अनेक राज्यांत प्रसिद्ध असल्यामुळे आदिवासी कुटुंबीयां सोबत येथे बोललेला नवस फेडण्यासाठी बोकडांचा,कोंबड्यांचा भाव देतात.आदिवासी समाजासाठी हे तिर्थक्षेत्र काशी म्हणून प्रसिद्धीस आहे.
.jpg)

.jpg)

.jpeg)