पोलिसांच्या कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह......नागरीकांण मध्ये चर्चेला उधान.....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा परिसरात मागील अनेक दिवसापासून चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दि.१७ मार्च २०२३ च्या मध्य रात्री सावळी सदोबा येथील राहुल पेशवे यांच्या कापूस भरुन असलेल्या भाड्याच्या गोदाऊनचे शेटर तोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला.
यासंदर्भात राहुल पेशवे यांनी पोलीस स्टेशन पारवा येथे तक्रार दाखल केली असून,पारवा पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आला.
मात्र मागील अनेक दिवसापासून चालू असलेल्या चोरीच्या घटनेमध्ये परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपावरील मोटार, स्टटर्स,पॅनल,केबल,शेती उपयोगी साहित्य,मोबाईल,व्यापाऱ्यांचे गोदाऊन,घरफोडी अशा अनेक चोरीच्या घटना घडत असतांना पोलीस प्रशासन मात्र बघायची भूमिका घेत आहे का? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.
चोरीचे अनेक प्रकरण या परिसरामध्ये घडत असतांना,पारवा पोलीस प्रशासनाकडून मात्र अशा प्रकरणाचा तपास शांत गतीने होताना दिसतोय, त्या मुळेच चोरी करण्याची चोरांची हिम्मत दिवसेन दिवस वाढलेली आहे. खाकी वर्दी वरून नागरिकांचा कुठेतरी विश्वास उडाल्याचे चित्र परीसरात दिसतोय,त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सदर प्रकरणाकडे लक्ष घालण्याची गरज आहे. अशी भावना वजा मागणी परिसरातील नागरिकांनी विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना केली व्यक्त केली आहे.

