राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या केंद्र सरकारचा आर्णी तालुक्यात तिव्र निषेध......
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजात त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत सभात्याग केला व विधानभवनच्या पायऱ्यावर काळ्या फिती लावून मोदी सरकारचा धिक्कार केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. कर्नाटकमधील २०१९ च्या एका सभेतील विधानाचा संदर्भ घेऊन खोटी तक्रार दाखल करत हा निर्णय घेतलेला आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न भाजपा मागील काही दिवसांपासून करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक आणि ठरवून केलेले असून, खासदारकी रद्द करण्याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा निर्णय हा लोकशाहीचा खून केला आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचे समजात त्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत सभात्याग केला व विधानभवनच्या पायऱ्यावर काळ्या फिती लावून मोदी सरकारचा धिक्कार केला.
तर देशात अनेक राज्यांमध्ये केंद्र सरकार चा निषेध करीत काॅंग्रेस कार्यकर्ते रसत्यावर उतरले
केंद्र सरकारच्या या दडपशाहीला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीचे निषेध आंदोलन काल दि.२६/३/२०२३ला आर्णी येथे जतरामपुर येथे रस्ता रोको करीत निषेध केला.
त्यावेळी शिवाजीराव मोघे माजी मंत्री, खाज्या बेग माजी आमदार विधान परिषद,बाळासाहेब मुंनगिनवार माजी आमदार,प्रविण शिंदे जिल्हा प्रमुख शिवसेना, मनिष पाटील माजी अध्यक्ष मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ,जितेंद्र मोघे युवा नेते,साजिद बेग,हरीश कुडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, अनिल आडे प्रथम नगराध्यक्ष आर्णी, विजय मोघे सरचिटणीस काँग्रेस कमिटी यवतमाळ,आरिज बेग माजी अध्यक्ष नगर परिषद आर्णी, प्रदिप वानखडे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ, गणेश हिरोळे वंचित बहुजन आघाडी, बाळासाहेब शिंदे जिनिंग अध्यक्ष, सुनील भारती,अनिस टेलर, अतुल देशमुख, राजु बुटले,राजीव विरखडे माजी सभापती आर्णी पं.स.,पंडित बुटले,चिराग शहा,अमोल मांगुळकर, निसार भाटी,फयाज सय्यद, महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


