Top News

Farmer suicide in Vidarbha is not going to stop......Suicide of debt fed up farmer at Bondala in Mul taluka.......

विदर्भात शेतकरी आत्महत्या काही थांबे ना......
मुल तालुक्यातील बोंडाळा येथे कर्जास कंटाळुण शेतकर्यांची आत्महत्या.......



 विदर्भ माझा न्युज 24 - मुल 


विदर्भातील चंद्रपूर जिल्हात तालुक्यातील मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबाळ पोलीस दुरुक्षेत्रांतर्गत येत असलेल्या बोंडाळा येथील एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आज दिनांक 14 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

जीवनदास नोमाजी पाल वय 45 वर्ष असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असुन, कर्जापाई बेजार झालेल्या या शेतकऱ्याने जमीन विकली होती. बँकेच्या कर्ज असल्याने तो मार्च अखेर कसा भरावा या विवंचनेत त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असावा असे बोले जात आहे. घराच्या मागील शेतात आंब्याच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली.



      त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा नववा वर्ग,एक मुलगी सातवा वर्ग, आई, भाऊ असा आप्त परिवार आहे. मुलाचा नुकताच नवोदय विद्यालयाकरिता नंबर लागला आहे. मात्र मुलाचे यश पाहण्याचे भाग्य या शेतकऱ्याला मिळाले नाही.

       पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मुल येथे पाठविले आहे. पुढील तपास सुरू आहे. 


एकच उपाय स्वतंत्र विदर्भ राज्य - रोहीत लोनारे विराआंस युवा आघाडी,शहर अध्यक्ष बल्हारशाह

विदर्भात सर्वाधीक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत,स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करणे ही काळाची गरज अस्तांना केंद्रातील भारतीय जनता पक्षा ने या कळे सरास दोळे झाक केली असुन राज्यातील भारतीय जनता पक्षाने देखील दिलेला शब्द अध्याप पुर्ण केलेला नाही. त्या मुळे शेतकरी आत्महत्या,बेरोजगारी,युवा पलायन,शेतकर्यांना शेती पंपाची मोफत विज, विदर्भातील जनतेला 200 युनीट मोफत विज, विज वहनकरा पासुन मुक्ती अश्या बर्याच समस्यांचे निवारण या वर एकच उपाय ते म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य. भारतीय जनता पक्षाने 2014 निवडनुकी पुर्वी विदर्भातील जनतेचा जनमत कौल घेतला होता त्यात सर्वाधीक मतदान हे स्वतंत्र विदर्भ राज्या च्या बाजुने करण्यात आले होते. मात्र तरी ही भाजप ने विदर्भातील जनतेला विदर्भ राज्य दिले नाही. आता तरी भाजप ने विदर्भ स्वतंत्र राज्य करावे अशे मत विदर्भ माझा न्युज 24 शी बोलतांना विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे बल्हारशाह शहर अध्यक्ष रोहीत लोनारे यांनी व्यक्त केले.

Previous Post Next Post