नागभीड येथील धक्कादायक प्रकार....शेजाऱ्याने बैलबंडी मागितली म्हणून उभारीने केला हल्ला........पोलिसांनी केला गुन्हा दाखल......
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
शेजाऱ्याने बैलबंडी मागितली म्हणून त्याच बंडीच्या उभारीने मारहाण केल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील देवपायली येथे घडली आहे. याप्रकरणी नागभीड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, लक्ष्मण उरकुडा कोहपरे वय- (75) आणि गणेश पटवार बोरघरे वय- (35) हे दोघे एक मेकांचे शेजारी आहेत. लक्ष्मण कोहपरे यांना शेतातील माल आणायचा असल्याने त्यांनी शेजारील गणेश बोरघरे यांना बैल बंडीची मागणी केली होती. याचा गणेशला राग आला त्याने रागाच्या भरात बैलबंडीची उभारी काढुन लक्ष्मणच्या डोक्यावर मारली.
यात लक्ष्मणला चांगलीच दुखापत झाली असुन तात्काळ त्यांना नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पोलिसांत तक्रार दाखल केली.
प्राप्त तक्रारीवरून नागभीड पोलिसांनी भादंविच्या कलम नुसार 307, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे.
