कीसान युवा क्रांती संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदी रविंद्र गेजीक यांची निवड.......
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी किसान युवा क्रांती संघटना या शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटनेची घोषणा यशवंत गोसावी यांशी केली आहे, आणि त्याच किसान युवा संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी रविंद्र गेजीक यांची निवड करण्यात आली आहे.
त्याबद्दल किसान युवा क्रांती संघटना च्या वतीने त्यांचे अभिनंदन केले जात आहे, रविंद्र गेजीक हे संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहतील असा विश्वास संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी व्यक्त केलाआहे. रविंद्र गेजीक यांना मिळालेली जवाबदारी शेतकरी चळवळीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल असे ही मत किसान युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी व्यक्त केले.
