भाजप युवा मोर्चा युवती जिल्हा अध्यक्षाच्या पतीचा अपघाती मृत्यु......चारचाकी वाहनाची पार्टी बेतली जीवावर.....
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
चार चाकी वाहणाची पार्टी जिवाव बेतल याचा कोंनाला अंदाज सुद्धा नसेल चंद्रपूर लागत असलेल्या लोहारा येथील मार्गावर चीचपल्ली जवळ पाच मित्र हे रविवार दि.12/3/2023 ला पार्टी करायला गेले कार उलटून भीषण अपघात घडला यात चालकाचा गाडी खाली दबून घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक किरकोळ जखमी झाला तर तिघे सुखरूप आहेत.मृतकाचे नाव हर्षल पारखी वय ( 32 ) वर्ष रा. दूध डेअरी परिसर, जलनगर वार्ड, चंद्रपुर आहे.
एका मित्राने जुनी कार खरेदी केल्याने पार्टी करण्यासाठी मद्याप्राशन करून हे 5 मित्र गेले. खरेदी केलेली सेकंड हॅन्ड फोर व्हीलर घेऊन जुनोना मार्गावर गेले असता, मात्र लोहारा येथील मार्गावर हर्षल पारखी याने वाहन मी चालवितो म्हणत गाडीची स्टेअरिंग हातात घेतली.
वाहनातील युवक हे मद्यपान करून असल्याने त्यांनी धावत्या वाहनात स्टंटबाजी केली, त्यांच्या स्टंटबाजी चे हे दृश्य अनेकांनी बघितले.
वाहनाचा वेग जास्त असल्याने वाहन अनियंत्रित होत पलटी झाले. मृतक हर्षल पारखी हे नुकतेच ड्रायव्हिंगचे शिक्षण घेत होते. त्यामुळे ते पारंगत नव्हते हर्षलने भरधाव वेगात कार पळवली यात नियंत्रण सुटल्याने कार जुनोना - लोहारा या मार्गावर कार पलटी झाली.
यात हर्षल गाडी खालीच दबल्या गेला तर एकाला किरकोळ जखमी झाली तर उर्वरित तिघांना फार काही झाले नाही.
मृतक हर्षल पारखी हे भारतीय जनता युवा मोर्चा युवती आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा स्वाती देवाळकर यांचे पती आहेत. मृतक हर्षल पारखी ला 8 महिन्याची लहान मुलगी आहे. हर्षल च्या मृत्यूने पारखे कटुंबीयांनवर दुःखांचे डोंगर कोसळले आहे.
