नागभीड येथे संशयास्पद मृत्य देह आढळले.....घातपात की वाघाचा हल्ला?....चर्चेला उधान.......
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
नागभीड वन विभाग अंतर्गत नाभगीड शिवटेकडी परिसरात निसर्गयान जवळ एका इसमाचा मृत्य देह मीळाल्याने सदर इसमाचा घातपात की वाघाचा हल्ला झाल्या या वर मात्र अध्यप प्रशन चिन्हच आहे. तर परीसलात खळबळ माजली आहे. सोमाजी तुळशीराम शिऊरकर वय ७० वर्षे रा. शिवनगर नागभिड असे मृत व्यक्तीचे नाव असुन तो काल सकाळच्या सुमारास सरपन आणण्यासाठी जंगलात गेला अस्ता सायंकाळ पर्यंत तो पर आलाच नाही. सदर इसम घरी आला नाही म्हणुन घरच्यांनी जंगल परीसरात जाऊन शोधा घेतला अस्ता निसर्गयान जवळ सदर व्यक्तीचा मृत्य देह दिसुन आला.
सदर मृत शरीराचे धोडे भाग वन्य प्राण्यांने खाले असल्याची प्रथमीक महीती आहे. सदर घटनेची माहीती वन विभागाला मीळताच वन विभागाने तातळीने घटना स्थळ गाठुन पंचनामा केला. सदर मृत व्येक्ती पच्छात पत्नी दोन मुल व एक मुलगी असा आप्त परीवार आहे.
मृत व्येक्तीच्या शरीरावरून अशी चर्चा आहे की,सदर इसमावर वाघाने कींवा अन्य वण्य प्रान्याने हल्ला केला अस्ता तर वाघाचे कींवा अन्य वण्य प्राण्याच्या नखाचे व दातांच्या जखमा दिसुन आल्या असत्या. सदर मृत शरीरावर तसल्या जखमा दिसुन आल्या नाही.त्या मुळे सदर मृत्यु घातपात असल्याची स्थानीकांन मध्ये चर्चा आहे.
