चंद्रपूर पोलिसांची नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला मोठी कार्यवाही......३ किलो गांजा जप्त.....
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला चंद्रपूर पोलिसांनी मोठी कार्यवाही करुन ३ किलो गांजा जप्त केला आहे. पडोली परिसरातील दोन घरात धाड टाकून ३२ हजार रुपयांचा ३ किलो २०० ग्रॅम गांजा स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत जप्त केला आहे.
सदर प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असुन, शेख मेहबूब हसन, राणी झा असे आरोपीचे नाव असून दोघेही पडोलीतील रहिवाशी आहेत. या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
सदर कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र बोबडे, बलकी, स्वामी यांनी केली आहे.

