उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांची मोठी कार्यवाही....
गाडीत तलवार घेऊन फीरनार्यांना फील्मी स्टाईल पाठलाग करून घेतले ताब्यात......
दोघांवर शस्त्र बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल.....
विदर्भ माझा न्युज 24 - घुग्गुस
संशयास्पदरित्या घुग्गुस येथुन वणी कडे जाणाऱ्या कारचा पाठलाग करून झडती घेतल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार व त्यांच्या चमुला कार मध्ये तलवार, हॉकी स्टिक व लोखंडी राॅड आढळून आल्या,कार मधील दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेत शस्त्र बंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
रविवारच्या मध्य रात्री पोलीसांची गस्त सुरू असतांना गस्ती दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार हे स्वतःही गस्तीवर असताना एम एच ३४ ए एम ८६६९ क्रमांकाची टोयोटा कंपनीची कार संशयास्पद रीत्या घुगुस या मार्गाने वणीकडे जात असताना उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांना संशय आल्याने त्यांनी पोलिस कर्मचार्यांसह कारचा पाठलाग केला, काही अंतरावर पाठलाग केल्यानंतर कारला थांबविण्यात यश आले, सदर कारची झडती घेतली असता कार मध्ये तलवार, हॉकी स्टिक व लोखंडी राॅड आढळून आले त्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी वाहनासह मानस सिंग व इर्शाद शेख दोघांनाही ताब्यात घेत शस्त्रबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून,पुढील कार्यवाही पोलिस करीत आहे.
