Breaking news_बापरे.....चंद्रपूर जिल्हात नकली देशी दारुचा करखाना.....
कारखान्यावर उत्पादन शुल्क विभागाची धाड.......
तब्बल १६,५०,००० रू. कींमती चा मुद्देमाल जप्त......
👆🏻 बघा संपूर्ण VIDEO
विदर्भ माझा न्युज 24 - मुल
मूल शहरापासून चार किलोमीटरवर असलेल्या चितेगाव गावाजवळ ए. व्ही. जी. गोट फार्म येथे आज दी.25/1/2023 रोजी दुपारी 12:00 वाजताच्या सुमारस राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून नकली देशी दारूचा कारखान्यात साडे सोळा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सद्या आरोपी फरार आहेत.
मुल - नागपूर रोड वर चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदी चे शिलेदार श्रमिक येलगार यांच्या चितेगाव येथील कार्यालयापासुन काही अंतरावर असलेल्या चंद्रपूर येथील रहिवासी अरुणा मरस्कोल्हे यांच्या ए. व्ही. जी. गोट फार्म वर अवैद्य नकली देशी दारूचा कारखाना असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर यांना मिळाल्यानंतर
आज दि.25/1/2023 रोजी दुपारी 12:00 वाजताच्या दरम्यान धाड टाकली असता येथील तीन खोलींमध्ये देशी दारुमध्ये वापरण्यात येणारे 14 बॅरल स्पिरिट, दीड लाख संत्रा देशी दारूचे लेबल, पन्नास हजारचे 90 मिली बॉटलीचे झाकण, सिलिंग मशीन, ब्लॅंडिंग मशीन असा एकूण साडे सोळा लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यातील आरोपी अरुणा मरस्कोल्हे, पवन वर्मा उर्फ गोलू आणी शाम मडावी हे फरार आहेत.
हा कारखाना मुल नागपूर महामार्गावर असून सुद्धा याची भनक कुणालाही लागली नाही याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 26 जानेवारी आणी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकी दरम्यान विक्री करण्याच्या दृष्टीने हा नकली दारू साठा तयार केला जात होता हे विशेष.
सदर कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे वाघ,संदीप राऊत,विकास थोरात,जगदीश पवार,अमीत सिरसागर,अभिजीत लिचडे,मोनाली कुरुडक यांनी केली.



