Top News

Rajura Taluka Agro Dealers Association elects Nandkishore Gaddai as President......

नंदकिशोर वाढई यांची राजुरा तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन  अध्यक्षपदी निवड......


 विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


 दिनांक २३ जानेवारी रोजी झालेल्या कार्यकारणी सभेमध्ये माऊली कृषी केंद्र राजुरा चे संचालक नंदकिशोर वाढई यांची सर्वानुमते राजुरा तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी निवड झाली. नंदकिशोर वाढई हे २००८ पासून  कृषी व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. ते एक उत्कृष्ट शेतकरी असून ते सामाजिक क्षेत्रात सुद्धा अनेक वर्षापासून काम करीत आहेत. त्यांच्या कृषीक्षेत्रातील व कृषी केंद्र व्यवसायातील अनुभव लक्षात घेता सर्व राजुरा तालुका ऍग्रो डीलर्स बंधूनी नंदकिशोर वाढई यांची सर्वानुमते असोसिएशन च्या राजुरा तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे.  त्याचबरोबर सुरेश सारडा यांची उपाध्यक्षपदी तर संतोष इदुरवार यांची सचिवपदी आणि पांडुरंग चन्ने, राजेश चांडक, प्रशांत गुंडावार, रवी कुकडे, राहुल पडवेकर, प्रवीण साळवे, भास्कर जुनघरी, शुभम बेजकीवार यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. 

         या प्रसंगी घेण्यात आलेल्या सभेला जेष्ठ ऍग्रो डीलर्स पांडुरंग चन्ने, राजेश चांडक, प्रशांत गुंडावार सुधीर धोटे, दातारकर साहेब, नेताजी शिरसागर, रमेश सारडा, जितू जयपुरकर, अनिल बोनगिनवार, घनश्याम तिवारी, रवी कुकडे, नितेश गिरटकर, प्रमोद जीवतोडे, विशाल येगिनवार, प्रवीण साळवे, आदी उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व उपस्थितांसह पानघाटे, डाखरे, दोरखंडे, नगराळे, देरकर या सगळ्या ऍग्रो डीलर्स व चंद्रपूर जिल्हा ऍग्रो डीलर्स च्या वतीने अभिनंदन करण्यात केले आहे.

Previous Post Next Post