चंद्रपुर शहरात मोठ्या प्रमानात ब्राऊन शुगर पोलिसांनी केला जप्त.....दोन आरोपी अटकेत....एक फरार.......
अम्लीपदार्थ विक्री करणार्यांचा व तसकरी करणार्यांचा कायमचा बंदोबस्त होनार कधी?
अम्लीपदार्था मुळे युवापीढी़ चे भवीष्य धोक्यात.......
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)
चंद्रपूर जिल्हात मागील काहि वर्षापासुन विविध व्यसनाचे प्रमाण युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. चंद्रपूर जिल्हाची दारूबंदी उठली त्यानंतर सुद्धा गांजा,ब्राऊन शुगर(गरदा) सह अनेक मादक पदार्थ छुप्या मार्गाने येतात व फ्कत शहरातच नाही तर संपुर्ण जिल्हातच याची विक्री होत आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परीसरात ब्राऊन शुगर(गरदा) ची विक्री होत असल्याची माहीती शहर पोलिसांना मिळाली शहर पोलिस स्टेशन च्या गुन्हे शोध पथकासह पोलिस निरीक्षक सुधाकर आंभोरे धाडमारण्या करीता स्वता बाबुपेठ येथे पोहचले वत्या ठीकानी धाडीत ३८ ग्रा. ब्राऊन शुगर ज्याची अंदाजे कींमत १ लाख असा मुद्दे माल जप्त केला. विषेश म्हणजे रेकाॅर्ड वर असलेला गुन्हेगार अजप दुपारे हा आपल्या आई वडीलांच्या हस्ते ब्राऊन शुगर (गरदा) विकण्याचे काम करीत होता, पोलिसांनी श्याम दुपारे व रेखा दुपारे यांना अटक केली असुन अजय दुपारे हा पसार झाला, कुनालाही संशय जाऊनये या साठी अजय ने आई - वडिलांचा वापर केला,अजय ब्राऊन शुगर बाहेरून आणुन आई वडिलांना विकन्यासाठी देत होता. अजय चा हा ब्राऊन शुगर विकण्याचा सुपर मास्टर प्लाॅन मात्र चंद्रपूर पोलीसांनी उधळुण लावला अश्या अवैद्य धंद्यावर लवकर आळा घालण्यासाठी शहर पोलिस तत्पर असल्याचे शहर पोलिसांनी सागीतले सदरची यशस्वी कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसींह परदेशी, उपवीभागीय पोलिस अधीकारी सुधीर नंदणवार,पोलिस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख जयप्रकाश निर्मल यांच्या नेतृत्वात शरीफ शेख,विलास निकोडे,महेंद्र बेसरकर,जयंता जुनारकर,दिलीप कुसराम व इम्रान खान यांनी केली. असुन या कारवाईचे अनेक स्तरावरून कौतुक केले जात असले तरी शहरात अनेक ठीकानी ब्राऊन शुगर चा सर्रास विक्री सुरुच आहे. या आधीही पोलिस प्रशासनाने जुनोना चौक परीसरात धाडी टाकुन ब्राऊन शुगर विक्रेत्यांना अटक केली आहे. मात्र यांचा कायमचा बंदोबस्त करण्यास पोलिस प्रशासनाला यश आलेला दिसत नाही. युवा पीढी़ दिवसेन दिवस अम्लीपदार्थांच्या व्यसनाने ग्रस्त होत चाली आहे.अम्लीपदार्थ जिल्हात येतो कसा? हा ही एक मोठा प्रश्नच आहे. युवापीढी़ चे भविष्य उज्वल करण्यासाठी सुरक्षीत करतण्या साठी प्रशासन जनजाग्रुती करेल काय? अम्लीपदार्थ आयात निर्यात करणे विक्री करणे यावर ठोस पावले उचलुन जिल्हा अम्लीपादार्थ मुक्त करेल काय? अशे अनेक प्रश्न आता जनसामन्यांण मध्ये उपस्थीत होत आहे.
