Top News

Action will be taken against Sarpanch Langadge of Datal.

दाताळाचे सरपंच लानगाडगे यांच्यावर होणार कारवाई.........


गैरव्यवहार प्रकरण : अपील फेटाळली     


विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर (चांदागड)

      दाताळा (नवीन) येथील सरपंच रवींद्र लोनगाडगे यांनी  गैरव्यवहार व अनियमीतता केल्याप्रकरणी लोखंडू रोहणे आणि नरेश चिवंडे यांनी तक्रार केली होती. याविरूद्ध लोनगाडगे यांनी अपील दाखल केले,मात्र ग्रामविकास मंत्रालय  न्यायालयाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारानुसार गुरुवारी त्यांची अपीर फेटाळून अपर आयुक्तांनी जारी केलेला कारवईचा आदेश कायम ठेवला त्या मुळे कारवाई होऊ शकते‌. दाताळाचे सरपंच  लोनगाडगे यांनी बॅंक  जमा केलेली लोकवर्गणीची पोचपावती मुद्रांकीत केली नाही,नळ योजनेचा वार्षीक जमाखर्च जमा केला नाही. ग्रामपंचायतीच्या ठरावाशिवाय नियमबाह्य खर्च केला,या सह एकून नऊ आरोपी लोखंडू रोहणे आणी नरेश चिवंडे यांनी तक्रारीतून केले होते. जी.प. चे  तत्कालीन मुख्य कार्यकारी

अधिकारी यांनी २९ डिसेंबर २०२० रोजी चौकशी अहवाल ग्रामविकास विभागाकडे सादर केला. या असवालानुसार सरपंच लोनगाडगे हे दोषी आढळले होते. अपर आयुक्तांनीही याबाबत आदेश दिला. दरम्यान या आदेशाविरूद्ध लोनगाडगे यांनी ग्रामविकास मंत्री यांच्या न्यायालयात अपील दाखल केले या प्रकरणाची १९ ऑक्टोंबर २०२२ रोजी मंत्रालयात सुनावणी झाली. सर्व संबंधितांनी आप आपली बाजु मांडल्या नंतर गुणवत्तेच्या आधारावर सरपंच लोनगाडगे यांचा अपील अमान्य करूण अप्पर आयुक्त नागपूर यांनी ६ जुलै २०२२ रोजी दिलेला कारवाईचा आदेश कायम करण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्रालय न्यायालयाने गुरूवारी दिला आहे. या प्रकरणाकडे अनेकांचे लक्ष  लागले  होते. ग्रामविकास विभागाणे सुनावणीनंतर हा आदेश जारी केला आहे‌.

Previous Post Next Post