Top News

Death penalty will be given if bullying is not stopped....Naxalites threaten to kill forest personnel.......

दादागिरी बंद केली नाही तर मृत्युदंड दिला जाईल....नक्षलवाद्यांनी दिली वन कर्मचार्यांना जीवे मारण्याची धमकी.......


बर्याच वर्षांनंतर नक्षलवाद्यांनी वनवीभागा वीरोधात पत्रक काढल्या मुळे विविध चर्चांना आले ऊत........




 विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली 

 सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात वन कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या वृक्षलागवडीला नक्षलवाद्यांनी विरोध दर्शवत हे काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना जिवाला मुकावे लागेल, अशी धमकी पत्रकांमधून दिली आहे.

गावातील आंबेडकर चौक परिसरात ही लाल शाईने लिहिलेली पत्रके आढळून आली आहेत. त्यात वनविभागाबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. वनविभागाची दादागिरी बंद करा, वनविभाग गरीब लोकांच्या जमिनीवर वृक्षलागवड करत आहे.

 ही दादागिरी बंद केली नाही तर मृत्युदंड दिला जाईल, असा मजकूर भाकपा {माओवादी} यांच्या नावे काढलेल्या त्या पत्रकांमध्ये आहे.

त्यामुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. बऱ्याच वर्षांनंतर नक्षलवाद्यांनी वन विभागाविरोधात पत्रक काढल्याने परिसरात विविध चर्चांना ऊत आला आहे.

Previous Post Next Post