हंसराज अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांचा वाढदिवस ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करुन मोठ्या उत्साहात साजरा.......
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने माननीय हंसराज अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात ग्रामीण रुग्णालययेथे फळ वाटप करून व विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख उपस्थिती सतीश उपलंचिवार शहराध्यक्ष गडचांदूर, डॉक्टर आकाश जीवने साहेब,डॉक्टर घाटे साहेब, संदीप शेरकी भाजपा नेते,उपस्थित होते नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी आपल्या भाषणात हंसराज अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री भारत सरकार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला हंसराज अहिर माझी केंद्रीय गृहराज्यमंत्री हे सर्व सामान्य जनतेचे कैवारी म्हणून ओळखले जातात त्यांनी अनेक शेतकऱ्यांना शेतीसाचा मोबादला मिळवून दिला,

प्रकल्प ग्रस्तांना नौकरी मिळवून देण्यासाठी सिंहांचा वाटा उचलला अशा अनेक विकास कामांना चालना दिली असे बोलून दाखवले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य पद्माकर गेडाम,मारोती मडावी, सुरेंद्र पावडे, रोशन कोडापे,सुरज दळांजे,चंद्रभान अलाम,मयुर मेकाले, सुधाकर कव्वलवार, दिवाकर गेडाम, सांवत पेंदोर,अनिल गेडाम,अमोल मडावी आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री पद्माकर गेडाम यांनी केले तर आभार मारोती मडावी यांनी मानले.