Top News

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा जनतेच्या विकासासाठी - आमदार धर्मराव बाबा आत्राम

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा जनतेच्या विकासासाठी - आमदार धर्मराव बाबा आत्राम 


दुसऱ्या टप्प्यातील यात्रेला मुलचेरा तालुक्यातुन शुभारंभ



 विदर्भ माझा न्युज 24 - गडचिरोली  


अतिसंवेदनशील, अतिदुर्गम, अविकसित,भागातील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी,शासकीय योजनेपासून वंचित नागरिकांचे विविध समस्या आवासून असून त्या समस्या जाणून घेऊन निराकरण तथा सोडवणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेचा दुसऱ्या टप्प्याला 8 ऑक्टोबर पासून मुलचेरा तालुक्यातून सुरुवात करण्यात आली असून. आज दुसरा दिवसही एटापल्ली तालुक्यातून गट्टा येते पहिल्या सभेच्या आयोजन करण्यात आले.


 या संवाद यात्रेत सिनेट सदस्य तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, युवक जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर , जिल्हा उपाध्यक्ष फहिम काझी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव  कैलाश कोरेत , बेबी नरोटे माजी सभापती पं. स एटापली,रमेश टिकले नगरसेवक एटापली ,सरिता गावडे नगरसेविका ,निर्मला हीचामी नगरसेविका, जांभिया पोलीस पाटील लालूं हीचामी,सरपंच राजू नरोटे ,उपसरपंच चावदू दोरखडी, किशोर हीचामी सेवानिवृत्त मुख्याध्यापक ,रेणु पुंगाठी माजी सरपंच जाबिया, कन्ना गोटा पोलीस पाटील गट्टा ,मारुती लेकामी उपसरपंच गट्टा, पूनम लेखामी सरपंच गट्टा , तसेच ललिता मडावी महिला तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एटापल्ली ,संजना हीचामी माजी नगरसेविका, विजुभाऊ अतमवार, लक्ष्मण जेट्टी ,रमेश तलांडी, सत्यनारायण मेरगा,आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेचे पहिल्या टप्प्याचे आयोजन 16 ते 23 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते.या दरम्यान जिल्ह्यातील उत्तर भागातील 6 तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आले.त्या भागातही संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.

 त्यानंतर दसरा आणि नवरात्र सण आटोपल्यावर लगेच अहेरी विधानसभेत संवाद यात्रेला सुरुवात झाली असून ९ ऑक्टोबर रोजी एटापल्ली तालुक्यातील गट्टा येथून हा संवाद यात्रेचा सुरुवात झाला.यावेळी जांबिया ,मलमपाडी, हेडरी, कांदोडी , बुर्गी, येमली, उडेरा, तुमरगुंडा ,पदेवाही, या गावात संवाद यात्रा काढून या परिसरातील शेतकरी,शेतमजूर, वंचित आणि दुर्लक्षित नागरिकांचे मूलभूत प्रश्न व समस्या आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी जाणून घेतले.


यावेळी नागरिकांनी विविध समस्या मांडले.आमदार आत्राम यांनी लगेच संबंधित अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून त्वरित समस्या सोडविण्याचे निर्देश दिले. काही समस्या वरिष्ठ पातळीवरचे असल्याने येत्या काही दिवसात त्याही समस्या सोडविण्याचे आश्वासन आमदार आत्राम यांनी दिले.

मागील दोन ते अडीच वर्षांपासून जनता दरबार,मासिक सभा,आमदार आपल्या दारी सारखे उपक्रम राबवून थेट जनतेपर्यंत जाऊन समस्या सोडविण्याचे काम सुरू असून आता परिवार संवाद यात्रेला सुद्धा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळेच संवाद यात्रा आयोजित गावातील नागरिकांनी मान्यवरांचा ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले हे विशेष.

Previous Post Next Post