Top News

चक्क नदीकाठावर जाऊन अन्नधान्य वाटप

चक्क नदीकाठावर जाऊन अन्नधान्य वाटप


राष्ट्रवादी काँग्रेसचा अभिनव उपक्रम


भाग्यश्री आत्राम यांनी जाणून घेतल्या दुर्गम भागातील नागरिकांची समस्या



विदर्भ माझा न्युज 24 - भामरागड


 तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी बहुल म्हणून ओळख असलेल्या गुंडेनूर आणि बंगाडी गावातील नागरिकांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अन्नधान्य किट व जीवनावश्यक वस्तु वाटप करण्यात आले.

हवामान खात्याचा अंदाजानुसार यंदा राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले.विशेष म्हणजे विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली.प्रामुख्याने अहेरी,सिरोंचा आणि भामरागड तालुक्याला मुसळधार पावसाचा जबर फटका बसला.जिल्ह्यात पूरपरिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आमदार रोहित पवारांना घेऊन अहेरी आणि सिरोंचा गाठले.यावेळी त्यांनी सिरोंचात मोठ्या प्रमाणात अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू वाटप करून नागरिकांना दिलासा देतानाच शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतली.एवढ्यावरच न थांबता त्यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि जिल्हा मुख्यालयात आढावा बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेतली.

    त्यावेळी पूरपरिस्थिती मुळे जिल्ह्यातील महामार्गासह अनेक महत्वाचे मार्ग बंद असल्याने भामरागड तालुक्यात जाता आले नाही.मात्र,भामरागड तालुक्यातील पार्लकोटा नदीवरील पूर ओसरल्यानंतर लगेच 20 ऑगस्ट रोजी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी भामरागड गाठून लाहेरी पलीकडील गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या आणि मोठ्या प्रमाणात अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तू वाटप केले.यावेळी जेष्ठ कार्यकर्ते कृष्णराव आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, भामरागड तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार,रामजी भांडेकर, लक्ष्मीकांत बोगामी,इरपा वड्डे,शामराव येरकलवार,संतोष भुरसे,ज्ञानेश्वर भांडेकर,गणेश गोटा,झुरु परसा,संजय पुंगाटी, जगदीश सडमेक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अजूनही गुंडेनूर नदीला पूर

भामरागड तालुक्यातील लाहेरी वरून 5 किलोमीटर अंतरावर गुंडेनूर नदी आहे.या नदीवर पूल नसल्याने नदी पलीकडील 10 ते 12 गावातील नागरिकांना जवळपास दिवाळी पर्यंत कंबरेभर पाण्यातूनच वाट काढावी लागते.सध्या पावसाने विश्रांती घेतले असलेतरी अजूनही नदीत मोठ्याप्रमाणात पाणी साचला आहे.परिणामी ट्रॅक्टर मध्ये अन्नधान्य घेऊन गुंडेनूर आणि बंगाडी गावात जाता न आल्याने नदी काठावर गावकऱ्यांना पाचारण करून अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.या भागातील नागरिकांना किराणा समान आणि इतर साहित्य घेण्यासाठी लाहेरी आल्याशिवाय पर्याय नाही.सध्या पूरपरिस्थितीमुळे या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.मात्र,भाग्यश्री ताई आत्राम यांच्या पुढाकाराने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Previous Post Next Post