Top News

भाग्यश्री आत्राम समस्या जाणून घेण्यासाठी पोहोचल्या थेट पाड्यावर

भाग्यश्री आत्राम समस्या जाणून घेण्यासाठी पोहोचल्या थेट पाड्यावर


नागरिकांशी संवाद साधून पूरपरिस्थितीची घेतली माहिती



विदर्भ माझा न्युज 24 - अहेरी



मागील जुलै महिन्यापासून अहेरी विधानसभेतील विविध तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातला होता.परिणामी येथील नागरिकांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला.पुराचा पाणी शेतात आणि नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेक संसार उघड्यावर आले.अश्या परिस्थितीत नागरिकांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेण्यासाठी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम थेट पाड्यावर पोहोचल्या.


नुकतेच अहेरी तालुक्यातील कमलापूर, छल्लेवाडा,राजाराम,वेंकटरावपेठा आणि देवलमरी आदी पाड्यावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली.यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आस्थेने संवाद साधून सुरू असलेले पंचनामे,भेटी दिलेल्या अधिकाऱ्यांची माहिती घेतली.


यावेळी विविध गावातील नागरिकांनी पावसाळयात पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली.बरेच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही तोंडचा घास हिरावला गेल्याचे निदर्शनास आले.प्रशासनातर्फे पंचनामे सुरू असून पावसाळी अधिवेशनात नक्कीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार असून मदत मिळवून देण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम प्रयत्नशील असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आमदार धर्मराव बाबा आत्राम मुंबईला आहेत आणि माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम विधानसभा पिंजून काढत स्थानिक पातळीवरील समस्या मुंबईपर्यंत पोहोचविण्याचे काम करत असल्याने येथील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.विविध गावात भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येर्रावार, अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनवास विरगोनवार, बाबुराव तोरेम, बालाजी गावडे, मखमुर शेख, सचिन सोनलवार,तसेच विविध गावातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post