राजुरा न.प. च्या घंटागाडी चालकाचा मृत देह मानीकगढ रेल्वे रूळावर आढळल्याने शहरात खळबळ......
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
राजुरा ते माणीकगढ रेल्वे स्टेशन कडे जानार्या रूळावर शनिवरी एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. युवकाची आत्महत्या की हत्या? अश्या अनेक चर्चां नागरीकांन मध्ये होऊ लागल्या,
घटनेची माहीती मीळताच राजुरा पोलिस घटनास्थळी दाखल होतच घटनेचा तपास सुरु केला तपासात युवकाची ओळख पटवीन्यात पोलिसांना यश आले, सदर युवकाचे नाव राहुल खोब्रागडे वय 20 वर्ष असल्याची माहीती मीळाली,सदर मृतक युवक हा राजुरा शहरातील रमाबाई नगर येथील निवासी असुन तो राजुरा नगरपरिषदेत घंटागाडी चालवीत होता.
राहुल हा मागील 3 दिवसापासुन बेपत्ता होता,त्याचा मृतदेह मागील 2/3 दिवसापासुन रेल्वे रूळा जवळ पडला असल्याचा प्राथमीक अंदाज आहे.
युवकाची कुणी हत्या करून मृत देह रेल्वे रूळा जवळ आणुन फेकले असेल का?या दिशेने राजुरा पोलीस अधीक तपास करीत आहे.

