अतिवृष्टीमुळे खचली महीला शेतकऱ्यांच्या शेतातली विहीर.....बेबीबाई पवार मदतीच्या प्रतिक्षेत......तहसीलदारांना निवेदन.....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील मौजा सुभाषनगर येथील महीला शेतकरी बेबीबाई पवार यांची अतिवृष्टीमुळे विहीर खचलेली आहे,विहीर दुरुस्ती करिता आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी बेबीबाई पवार यांनी तहसीलदार आर्णी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे,बेबीबाई पवार यांची मौजा सुभाषनगर येथे शेत सर्वे न.७२-क्षेत्र ३.२४ ही स्वतःच्या मालकीची शेती असून,सततच्या पावसामुळे त्यांच्या शेतातील विहीर पूर्णपणे खचली आहे,त्यामुळे भविष्यात शेती कशी करायची असा प्रश्न या महिला शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे,विहीर खचल्याने त्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे,त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून,महीला शेतकरी बेबीबाई पवार हवालदिल झालेल्या आहे,त्यामुळे भविष्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न या महीला शेतकऱ्यासमोर उभा आहे,खचलेल्या विहिरीचा तलाठ्याने पंचनामा करून विहीर दुरुस्तीसाठी आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी महीला शेतकरी बेबीबाई पवार यांनी तहसीलदार आर्णी यांना दिलेल्या एका लेखी निवेदनातून केली आहे.

