सावळी सदोबा परिसरामध्ये पावसाने घातले थैमान......
शेतकर्यांचे मोठ्या प्रमानात नुकसान.......
सावळी सदोबा परिसरामध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे ढगफुटी सारखे पाऊस मोठ मोठ्या सरी कोसळत होत्या सुभाष नगर गावामध्ये वादळी वाऱ्यासहित असा मोठा पाऊस आला की या पावसामुळे कित्येक शेतकऱ्यांचे शेतात बांधामध्ये पाऊसच पाऊस दिसत होता, अशी माहीती गावकर्यांनी दिली आहे,
बघा व्हीडीयो -
असा भयानक पाऊस आम्ही या दहा वर्षांपूर्वी सुभाष नगर गावामध्ये बघितलं होतं तशाच प्रकारचा पाऊस सुभाष नगर गावामध्ये चालू होता या पावसामुळे कित्येक घरामध्ये पाऊस अक्षरशः पडत होता बरेच असे लोकांच्या घरामध्ये पण पाऊस कोसळत होता जीव मुठीत धरून बरेच गरीब गरजू शेतकरी हवालदाल झाल्याचा कासावीसा करत होते, यामध्ये संपूर्ण सुभाष नगर गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याच बरोबर अतिवृष्टी सारखा पाऊस झाल्यामुळे नाल्या लगतचे शेतकऱ्यांच्या शेतीचे जास्त नुकसान झाले शासनाने विशेष लक्ष देऊन सुभाष नगर लोहकरवाडी नागरिकांना व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी संबंधित तलाठी व मंडळ अधिकार्यांनी व नायब तहसीलदारांनी प्रत्यक्षात येऊन पंचनामा करून योग्य ती भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी आवर्जून सावळी सदोबा सर्कलतील तमाम शेतकरी बांधव शासनाकडून मदत मिळेल अशी अपेक्षा करत आहे,
अशा तत्पुंदी मदतीने शेतकऱ्यांचे काही होणार नाही परंतु फुल नाही फुलाची पाकळी जरी शेतकऱ्याला मदत मिळाली तर तेवढ्या तरी आधार होईल या अपेक्षेने शेतकरी वाट पाहत आहे,
सुभाषनगर येथील विहीर धोक्यात.....
त्याचबरोबर ग्रामपंचायत सुभाषनगर येथील विहीर नालालगत असल्यामुळे त्या विहिरीमध्ये सुद्धा या पुराचे पाणी सुद्धा गेले असेल असे गावकऱ्यां मध्ये चर्चा चालू आहे अशा दूषित पाण्यामुळे नागरिकाचे भवितव्य व आरोग्य धोक्यात येण्याचे चिन्ह आहे यासाठी सुभाष नगर गावामध्ये शासनाने ग्रामपंचायत विहिरीवर पूर संरक्षण भिंत बांधून नागरिकाचे आरोग्य सुदृढ कसा करता येईल याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे असेही गावकर्यांचे म्हणने आहे.


