प्रधानमंत्री पीक विमा भरण्यासाठी शेतकर्यांना मुदतवाढ देण्यात यावी- हर्षल पाटील फदाट
मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना मा.तहसीलदार जाफ्राबाद यांच्या मार्फत निवेदन सादर
विदर्भ माझा न्युज 24 - जाफ्राबाद
शेतकऱ्यांसाठी शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत असते,नैसर्गिक आपत्तीत पीक नुकसान झाले तर शेतकऱ्यांना भरपाई मिळावी.यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते.
सध्या प्रधानमंत्री पीक विमा भरणे चालु आहे. पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै असून,शेवटचे फक्त काही दिवसच शिल्लक आहे.या दिवसांमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचे प्रधानमंत्री पिक विमा भरणे होत नसल्याने तात्काळ शेतकरी बांधवाला पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार जाफ्राबाद यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
शेतकर्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ई-पिक पाहणी नोंदणी यामध्येच शेतकरी वर्गामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पिक विमा भरण्यासाठी तलाठ्या मार्फत शेतकर्याना वेळेवर सात बारा उतारे न मिळणे नाही. सर्वर डाऊन असल्याची समस्या,अशा विविध कारणामुळे अनेक शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा भरण्यापासून वंचित राहत असल्याने पीक विमा भरण्यासाठी शेतकर्यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी हर्षल पाटील फदाट (बापू)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
