Top News

तोहोगाव ग्रामपंचायत चे जनतेच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष?....

तोहोगाव ग्रामपंचायत चे जनतेच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष?....


7 दिवसात समस्येचे निवारन न झाल्यास ग्रामपंचायत पदाधिकार्यांच्या हस्ते त्या साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी व्रूक्षारोपन करू - भाजयुमो



विदर्भ माझा न्युज 24 - गोंडपीपरी

 

तोहोगाव ग्रामपंचायत चा कारभार हा सूस्थ असल्याची चर्चा गावकर्यांन मध्ये रंगली आहे,ग्रामपंचायतला जनतेच्या प्रश्नांचे काहीही देण घेने नसल्याचा आरोप भाजयुमो चे प्रतीक कासनगोट्टूवार यांनी केले आहे,

सविस्तर वृत्त असे आहे की, तोहोगाव येथील विठ्ठल मंदिरा कडे जानारा रस्ता हा पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे पूर्ण जलमय असतो जर त्या रस्त्याच्या बाजूने नाली काढली तर ते साचलेले पाणी निघून जाइल व रस्ता मोकळा होईल या बाबद भाजपा युवा मोर्चा द्वारे निवेदन‌ही देण्यात आले होते, मात्र बघता बघता 20 दिवस  निघुन‌गेले मात्र अध्यापही ग्रामपंचायत ने समस्येचे निवारन केले नाही जर का 7 दिवसात रस्तावरील साचलेल्या पानी काढन्या साठी उपाय योजना करून रस्ता रहदारीस मोकळा करून न दिल्यास ग्रामपंचायत पदाधिकारी याचे हस्ते त्या साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी व्रूक्षारोपन करू असा इशारा भाजपा युवा मोर्चा तोहोगाव ने दिला आहे.

Previous Post Next Post