Top News

गुवाहाटीमधून 40 आमदारांचे 'मृतदेह' येतील,संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य....

गुवाहाटीमधून 40 आमदारांचे 'मृतदेह' येतील,संजय राऊतांचे वादग्रस्त वक्तव्य....



 विदर्भ माझा न्युज 24 - मुंबई

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. दहिसर येथीलशिवसेनेच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर कठोर टीका करताना धक्कादायक वक्तव्य केले. गुवाहाटीला गेलेले आता जिवंत प्रेतं आहेत आणि ही जिवंत प्रेतं आता मुंबईत येतील, तेव्हा त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू असं वक्तव्य संजय राऊतांनी  केलं आणि यावरुनच आता देशभर गदारोळ होतोय. 

बंडखोरांविरोधात आता शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने बंडखोरांविरोधात संघटनात्मक मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. आज मुंबईतील दहिसरमधील शिवसेना मेळाव्यास संबोधित करताना शिवसेन नेते संजय राऊत यांनी आक्रमक भाषण केले. यावेळी त्यांनी म्हटले की,  40 आमदारांचे मृतदेह थेट गुवाहाटीमधून येतील. त्यांना थेट शवागृहात पोस्टमोर्टमसाठी पाठवू. गुवाहाटीमध्ये एक मंदिर आहे. या मंदिरात रेड्याचा बळी दिला जातो. आम्ही 40 रेडे पाठवले असल्याचेही वक्तव्य राऊत यांनी केले. राऊत यांच्या या वक्तव्यावरून आणखी राजकारण तापणार असल्याचे म्हटले जात आहे.  

Previous Post Next Post