Top News

हे सरकार अल्पमतात आहे....एकनाथ शिंदे यांना सुरक्षा द्यावी....

हे सरकार अल्पमतात आहे....एकनाथ शिंदे यांना सुरक्षा द्यावी....


एकनाथ शिंदे अडचणीत आल्यास आरपीआय त्यांना पाठिंबा देईल – रामदास आठवले



विदर्भ माझा न्युज 24 - मुंबई 

 शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाचा आज पाचवा दिवस आहे. गेल्या पाच दिवसांपासून एकनाथ हे शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि अपक्ष आमदारांच्या गटासह आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. दाव्यांचे चक्र सुरूच आहे. एकामागून एक विधाने समोर येत आहेत. इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सरकारला वाचवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. दोन्ही बाजूंमधील भांडण सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

एकनाथ शिंदे अडचणीत आल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Rpi) त्यांना पाठिंबा देईल, असे आठवले म्हणाले. “हे सरकार अल्पमतात आहे. एकनाथ शिंदे हा मोठा गट आहे. एकनाथ शिंदे यांना सुरक्षा द्यावी,” असे देखील आठवसे म्हणाले.

मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. शिवसेनेतील गटबाजीशी आमचा काहीही संबंध नाही. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आपापसातील वाद मिटवतील, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. आम्ही वाट पाहत आहोत, असे आठवले म्हणाले.

शिवसेनेला टोला लगावत आठवले म्हणाले, “आमदार तुमच्याकडे येतील असे तुम्हाला वाटते. जेव्हा त्यांना यावे लागेल तेव्हा ते येतील. पण तोपर्यंत घाबरू नका. एकनाथ शिंदे अडचणीत आले तर त्यांच्याकडे आरपीआय आहे.”

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “आम्ही सरकार स्थापनेचा विचार केला नाही. काय होते ते येणार्‍या काळात बघू. शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत बहुमत दाखवू असे म्हणतात. अनेक आमदार सोडून गेले. शिवसेनेचे ३७ आणि ७-८ अपक्ष, त्यामुळे ते कसे बहुमत दाखवतात बघू.”

Previous Post Next Post